Homeमहाराष्ट्रपरिवर्तनाचा मार्ग दाखवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार आजही समाजाला योग्य...

परिवर्तनाचा मार्ग दाखवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार आजही समाजाला योग्य दिशा देणारे आणि प्रेरणादायी ठरतात

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला केंद्रस्थानी ठेवून धर्म, समाज आणि शासन यांचा विचार मांडला. त्यांच्या मते, शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन असून स्वावलंबन आणि संघर्ष करूनच आपल्याला यश मिळते. आंबेडकरांचे विचार आजही समाजाला योग्य दिशा देणारे आणि प्रेरणादायी ठरतात. चला तर मग जाणून घेऊया.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय समाजव्यवस्थेतील अन्याय, विषमता आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढणारे समाजसुधारक, विचारवंत आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. त्यांच्या सामाजिक विचारांची मुळे त्याच्या वागण्यात आणि बोलण्यात खोलवर रुजलेली होती. डॉ. आंबेडकरांचे सामाजिक विचार आपल्या भारतीय समाजाच्या परिवर्तनासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार – 14 एप्रिल या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या काही अनमोल विचारांची शिकवण घेऊया. बाबासाहेबांचे हे विचार आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करून तुम्ही लोकांमध्ये प्रेरणा आणि आत्मविश्वास निर्माण करू शकता.

बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार आपल्याला कमीपणा वाटेल असे कपडे कधीच घालू नका.
स्वातंत्र्य विचारसरणीचे आणि स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा ! लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’. शीलाशिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे.

दैवावर आणि आपल्या नशिबावर भरवसा ठेवू नका. जे करायचे आहे ते मनगटाच्या जोरावर करा.
चारित्र्य शोभते संयमाने, आणि सौंदर्य शोभते शीलाने. माणूस धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.
करूणेशिवाय विद्या बाळगणाऱ्याला मी कसाई समजतो. शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे.

मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल, तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे. कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय. लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे तर, लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती होय. धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे. मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते.
शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याचा विचार केला पाहिजे.

सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही. अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनले पाहिजे. मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी आजन्म विद्यार्थीच आहे. ज्यांच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही. सामाजिक समतेचा बुद्धाइतका मोठा पुरस्कर्ता जगात झालाच नाही. महामानव असला तरी त्याच्या चरणी व्यक्ती-स्वातंत्र्याची फुले वाहू नका. आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग?

हिंसा ही वाईट गोष्ट आहे, परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे. जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहितरी करून दाखवायचे आहे अशी महत्त्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात. मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते.
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे; लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.

शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल, तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. मी एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून करतो. जर या देशात शुद्रांना शस्त्र धारण करण्याचा अधिकार असता तर हा देश कधीच पारतंत्र्यात गेला नसता. तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका.

सर्व प्रकारच्या सामाजिक उन्नतीची गुरूकिल्ली म्हणजे राजकिय शक्ती हीच होय. जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो. माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वतःला मोठा समजू लागला तर, तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो.

बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका. एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो, त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे. शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील.
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त नवा संकल्प करा

बाबासाहेबांचे विचार हे केवळ वाचण्यापुरते नसून ते आपल्या आयुष्यात आचरणात आणण्यासारखे आहेत. त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळे आपल्याला स्वाभिमान, समता, शिक्षण आणि संघर्ष यांचे खरे महत्त्व समजते. आजच्या आधुनिक समाजातही त्यांच्या विचारांची गरज गरज आहे, कारण ते आपल्याला जीवन जगण्याची योग्य दिशा दाखवते. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण केवळ त्यांना अभिवादन न करता, त्यांच्या विचारांनुसार जगण्याचा संकल्प करून आपण त्यांना आदरांजली वाहिली पाहिजे.

शब्दलेखन
सौ . प्रेमनंदा दामोदर गायकवाड ज्येष्ठ विचारवंत मुंबई

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ज्येष्ठांच्या आयुष्याला आधाराचा हात; बीड तहसीलमध्ये ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्राची सुरुवात

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान, सुरक्षितता आणि न्यायप्रवेशाला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड आणि...

कर्जमाफीच्या शासन निर्णयाचा निषेध करून काँग्रेस पक्षाच्या वतीने शासन निर्णयाची केली होळी. बबनराव नागरे

0
देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना महाराष्ट्र शासनाने निर्णय क्रमांक कृक्रमा ०५२६/प्रक९३/का २स नुसार फसवी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे....

माहिती अधिकार अधिक सुसूत्र; राज्यात नवे नियम लागू

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): महाराष्ट्र शासनाने माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत नवीन “महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, २०२६” जाहीर केले असून हे नियम राजपत्रात प्रसिद्ध...

वन हक्क समिती अभावी फासेपारधी समाजाचे वनदावे रखडले. जिल्हाधिकाऱ्याकडे न्यायाची मागणी. बबनराव नागरे

0
(देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी): दिनांक 16 जून 2026 रोजी देऊळगाव राजा तालुक्यातील सेवा नगर अंडेरा येथील फासेपारधी समाजाच्या वनधारकांनी वन हक्क समिती स्थापन नसल्यामुळे...

पुणे महापालिकेच्या ड्रेनेज प्रकल्पात कोट्यवधींचा घोटाळा? अधिकृत PMC कन्सल्टंट, कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर संशय

0
टाईम्स ऑफ महाराष्ट्रचा मोठा गौप्यस्फोट: अकरा गावांच्या ड्रेनेज प्रकल्पातील धक्कादायक कागदपत्रे टाईम्स ऑफ महाराष्ट्राच्या हाती... पुणे (मुज्जम्मील शेख) : पुणे महानगरपालिकेच्या मलनिस्सारण विभागातील नव्याने समाविष्ट...

error: Content is protected !!