Homeताज्या बातम्या५० लाखांची लाच मागणाऱ्या भुमी अभिलेख उपअधीक्षक अमरसिंह पाटील आणि भूकरमापक किरण...

५० लाखांची लाच मागणाऱ्या भुमी अभिलेख उपअधीक्षक अमरसिंह पाटील आणि भूकरमापक किरण येटाळे यांच्यावर गुन्हा दाखल…

५० लाखांची लाच मागणाऱ्या भुमी अभिलेख उपअधीक्षक अमरसिंह पाटील आणि भूकरमापक किरण येटाळे यांच्यावर गुन्हा दाखल…

शासकीय जमिनीच्या मोजणीनंतर हद्द निश्चितीसाठी लाचेची मागणी; लाच न दिल्याने चुकीची ‘क’ प्रत तयार करून नुकसान केल्याचा आरोप…

पुणे, दि.18 एप्रिल 2025: येरवडा पोलीस ठाण्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने एका मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पुण्यातील भुमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील आणि भुकरमापक किरण येटाळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 308(2), 198, 201 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 चे कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कुणाल चंद्रशेखर अष्टेकर (वय 41, व्यवसाय – व्यावसायिक, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी आपल्या मालकीच्या हडपसर येथील सर्वे नं. 181/3, 181/4अ, 181/6 व 181/9/1 या जमिनीची मोजणी कायदेशीर रितीने सन 2023 व 2024 मध्ये करून घेतली होती. तथापि, या मोजणीनंतर हद्द निश्चितीसाठी आरोपी अमरसिंह पाटील व किरण येटाळे यांनी मिळून ५० लाख रुपयांची लाच मागितल्याचे आरोप आहेत.

फिर्यादी यांना धमकी देताना आरोपी येटाळे यांनी रक्कम २५ लाखांवर आणून दिली नाही तर “हेलिकॉप्टर शॉट” लावण्याची आणि मालमत्तेचे नुकसान करण्याची धमकी दिली. लाच न दिल्याने आरोपींनी मालकाच्या शेजारच्या जमिनीची खोटी ‘क’ प्रत तयार करून, त्या आधारावर फिर्यादीचे नुकसान केल्याचे नमूद आहे.

या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त (ACP) मच्छींद्र खाडे तपास करत आहेत. 

या प्रकरणामुळे सरकारी कार्यालयांतील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तपास सुरु असून लवकरच कारवाईची अपेक्षा तक्रारदार व्यक्त केली जात आहे.

भूमी अभिलेख तक्रारदार कृती समितीच्या पाठपुराव्याला यश…

या प्रकरणांमध्ये जवळपास साडेतीनशे तक्रारदार असून या सर्व तक्रार दारांना एका व्यासपीठावर आणण्याचा काम हिंदी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पत्रकार मुज्जम्मील शेख आणि सचिन तापकीर यांनी केले होते. गुन्हा दाखल आणि अमर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा आणि हे बडतर्फ व्हावे यासाठी कृती समितीने सातत्याने महसूल मंत्री व राज्य शासनाकडे प्रयत्न केले होते. या पाठपुराव्याला त्यांना यश प्राप्त झाले आहे.

अमरसिंह पाटील यांची खाते अंतर्गत चौकशीही होती सुरू…

दरम्यान, अमरसिंह पाटील यांच्याविरुद्ध खातेस्तरावरही चौकशी सुरू आहे. हवेली तालुक्यातील मोजणी प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळल्याने राज्याच्या अप्पर जमाबंदी आयुक्त सरिता नरके यांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले होते. २२ व २३ मार्च रोजी शासकीय सुट्टी असूनही कार्यालय सुरू ठेवून तपासणी करण्यात आली होती. या चौकशीमुळे प्रशासनात खळबळ माजली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!