Homeउद्योगसेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या MSME आउटरीच मोहिमेतून जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांना आर्थिक बळ,...

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या MSME आउटरीच मोहिमेतून जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांना आर्थिक बळ, ३०.५० कोटी मंजूर

विनोद पवार  ( जळगाव प्रतिनिधी ) :  जिल्ह्यातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) चालना देण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने राबविण्यात आलेल्या MSME क्रेडिट आउटरीच मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील उद्योजकांसाठी ३० कोटी ५० लाख रुपयांहून अधिक कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे अनेक उद्योजकांना उद्योग विस्तारासाठी आवश्यक आर्थिक पाठबळ मिळाले आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जळगाव प्रादेशिक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली बीआरसीआर युनिट, जळगाव येथे आयोजित या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बँकेकडून विविध कर्ज योजना, टर्म लोन, खेळते भांडवल, अल्प व्याजदरातील कर्ज सुविधा तसेच सुलभ हप्त्यांवरील योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एमएसएमई क्षेत्र देशाच्या आर्थिक प्रगतीचा कणा असल्याचे नमूद करत, आत्मनिर्भर भारत अभियानात उद्योजकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. कर्ज प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून पात्र उद्योजकांना वेळेत वित्तपुरवठा करण्यावर बँकेचा भर असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

या आउटरीच मोहिमेमुळे नवउद्योजकांसह विद्यमान उद्योगांना व्यवसाय विस्तार, यंत्रसामग्री खरेदी आणि रोजगारनिर्मितीसाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

दरम्यान, यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय महासचिव विनोद सुधाकर पवार यांनी सांगितले की, शासन आणि बँकांच्या विविध योजनांची माहिती अनेकदा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे अशा आउटरीच उपक्रमांची व्याप्ती वाढवून छोटे व्यावसायिक, ग्रामीण भागातील उद्योजक आणि नव्याने उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

एमएसएमई आउटरीच मोहिमेमुळे जिल्ह्यात रोजगारनिर्मितीला चालना मिळून औद्योगिक विकासाचा वेग वाढेल, असा विश्वास कार्यक्रमाच्या शेवटी व्यक्त करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!