Homeताज्या बातम्याछत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कुर्झा प्रभागात मॅरेथॉनसह विविध उपक्रम उत्साहात

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त कुर्झा प्रभागात मॅरेथॉनसह विविध उपक्रम उत्साहात

रुपेश देशमुख ( ब्रह्मपुरी प्रतिनिधी ) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त ब्रह्मपुरी शहरातील कुर्झा प्रभागात विविध सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कुर्झा महालक्ष्मी नगर व विद्यानगर उत्सव समिती तसेच सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

शिवजयंतीच्या औचित्याने १४ वर्षाखालील, १० वर्षाखालील व खुला गट अशा विविध वयोगटांतील महिला, पुरुष तसेच मुला-मुलींसाठी मॅरेथॉन दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भैय्या राईस मिल ते जगनाडे महाराज चौक, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कुर्झा या मार्गावरून छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत अनेक स्पर्धकांनी उत्साहात सहभाग नोंदविला. या स्पर्धेचा शुभारंभ नगराध्यक्ष योगेश मिसार, प्रथम नगराध्यक्ष तथा उद्योजक अशोक भैय्या व इतर मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.

कुर्झा वार्डातील शिवाजी महाराज चौकात भव्य तीनदिवसीय शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमास नगरसेवक, पत्रकार, शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू घडविण्याच्या उद्देशाने असे उपक्रम सातत्याने राबविले जातील, असा निर्धार आयोजकांनी यावेळी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!