Homeमनोरंजनब्रह्मपुरीत वाचनाचा सन्मान श्रीराम विखार ठरले ‘पुस्तकाचे घर’चे उत्कृष्ट वाचक

ब्रह्मपुरीत वाचनाचा सन्मान श्रीराम विखार ठरले ‘पुस्तकाचे घर’चे उत्कृष्ट वाचक

रुपेश देशमुख (ब्रह्मपुरी प्रतिनिधी ) : 

वाचनसंस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने ब्रह्मपुरी शहरातील कुर्झा वार्डात सुरू करण्यात आलेल्या ‘पुस्तकाचे घर’ या उपक्रमातील वर्षभरातील उत्कृष्ट वाचक म्हणून श्रीराम विखार यांची निवड करण्यात आली. त्यांना नुकताच मान्यवरांच्या हस्ते ‘उत्कृष्ट वाचक’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

कवी, लेखक, पत्रकार तसेच ३३ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. धनराज खानोरकर यांनी वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी सुमारे एक लाख रुपयांची पुस्तके उपलब्ध करून ‘पुस्तकाचे घर’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. हा ग्रंथसहवास सर्व वाचकांसाठी मोफत खुला असून विविध विषयांवरील ग्रंथांचा लाभ नागरिक घेत आहेत.

श्री क्षेत्र आळंदी येथील ह.भ.प. माऊली महाराज जाहूरकर यांच्या शिवकीर्तन कार्यक्रमाचे औचित्य साधून श्रीराम विखार यांना उत्कृष्ट वाचक म्हणून सन्मानित करण्यात आले. या वेळी महाराजांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास संयोजक डॉ. धनराज खानोरकर, नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती विलासभाऊ विखार, नगरसेवक चंद्रकांत बावनकुळे, सुखदेव खेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘पुस्तकाचे घर’ मध्ये सर्वाधिक पुस्तके वाचून त्यातील आशय आत्मसात करून कथन करणाऱ्या वाचकाचा दरवर्षी शिवजयंती उत्सवाप्रसंगी गौरव करण्यात येईल, असे आवाहन संयोजकांनी यावेळी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!