Homeमहत्त्वाचेकेरळ टुरिझमच्या ‘लेन्स्केप केरळ’ भव्य छायाचित्र प्रदर्शनाचे पुण्यात उद्घाटन

केरळ टुरिझमच्या ‘लेन्स्केप केरळ’ भव्य छायाचित्र प्रदर्शनाचे पुण्यात उद्घाटन

Times Of Maharashtra Desk : पुणे ‘गॉड्स ओन कंट्री’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळच्या निसर्गसौंदर्य, सांस्कृतिक वैविध्य आणि जीवनशैलीचे दर्शन घडवणारे केरळ टुरिझमतर्फे आयोजित अखिल भारतीय ‘लेन्स्केप केरळ’ या भव्य छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज पुण्यात करण्यात आले. हे प्रदर्शन राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी येथे भरवण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन राजश्री देशपांडे आणि चित्रपट दिग्दर्शक मंगेश जोशी यांच्या हस्ते झाले. देशातील दहा नामवंत ट्रॅव्हल व मीडिया छायाचित्रकारांनी केरळमधील विविध भागांत टिपलेली १०० निवडक छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत.

या प्रदर्शनाचे क्युरेशन प्रख्यात कला समीक्षक व क्युरेटर उमा नायर यांनी केले असून, ख्यातनाम वन्यजीव व संवर्धन छायाचित्रकार बालन माधवन हे ‘डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी’ आहेत. उद्घाटनानंतर उमा नायर यांनी बालन माधवन आणि छायाचित्रकार सौरभ चॅटर्जी यांच्यासह प्रदर्शनाची विशेष फेरी घेतली.

केरळला केवळ पर्यटनस्थळ म्हणून न मांडता, या प्रदर्शनातून राज्याचे निसर्गसौंदर्य, ग्रामीण व सागरी जीवन, वन्यजीव, वास्तुकला, उत्सव आणि अध्यात्मिक पैलू प्रभावी छायाचित्रांतून उलगडण्यात आले आहेत.

ऑनलाइन संदेशात केरळचे पर्यटन मंत्री पी. ए. महंमद रियाझ यांनी सांगितले की, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या पुण्यासारख्या शहरात केरळच्या उबदारपणा व चैतन्याचा अनुभव देणारे हे व्यासपीठ सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. ‘लेन्स्केप केरळ’ हा राज्याच्या सांस्कृतिक विविधतेचा उत्सव आहे.

ते पुढे म्हणाले की, २०२५ मध्ये केरळ पर्यटनाने २.५८ कोटींपेक्षा अधिक पर्यटकांची नोंद करत विक्रमी वाढ साधली असून, अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे पर्यटनाला नवी दिशा मिळत आहे.

हे छायाचित्र प्रदर्शन २० फेब्रुवारीपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले असून, १९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत ‘मास्टर क्लास’चे आयोजन करण्यात आले आहे.

पुण्यानंतर हे प्रदर्शन बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि सूरत येथे आयोजित करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

error: Content is protected !!