Homeताज्या बातम्यादौंडमध्ये बोरावके नगर ते देव पाम रस्ता महिनोन्‌महिने अर्धवट, नागरिकांची तीव्र नाराजी

दौंडमध्ये बोरावके नगर ते देव पाम रस्ता महिनोन्‌महिने अर्धवट, नागरिकांची तीव्र नाराजी

दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड राहुल आढाव)

दौंड शहरातील बोरावके नगर ते देव पामपर्यंतचा रस्ता विकासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्र शासन व दौंड नगरपरिषद अंतर्गत मंजूर करण्यात आलेले हे काम कित्येक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

मंजूर आराखड्यानुसार बोरावके नगर ते देव पामपर्यंत संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात हे काम सरपंच वस्ती, संविधान तिरंगा चौकापर्यंतच करण्यात आले असून त्यापुढील भागात रस्ता खोदून खडी व मुरूम टाकून काम थांबवण्यात आले आहे.

सध्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरलेली असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकी, सायकलस्वार व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक ठरत आहे. खडीवरून वाहने घसरत असल्याने अपघाताचा धोका देखील वाढला आहे.

पावसाळा जवळ येत असताना या रस्त्यावर चिखल व पाणी साचण्याची शक्यता असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काम सुरू करून महिनोन्‌महिने अर्धवट ठेवणे ही गंभीर बाब असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

संबंधित ठेकेदार व प्रशासनाने तातडीने उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी बोरावके नगर ते देव पाम परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!