Homeताज्या बातम्याठेकेदाराकडून स्वखर्चातून जनतेसाठी स्पीड ब्रेकर व खड्डे भरण्याचे काम

ठेकेदाराकडून स्वखर्चातून जनतेसाठी स्पीड ब्रेकर व खड्डे भरण्याचे काम

संघराज गायकवाड ( दौंड प्रतिनिधी ) :  शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक दिलासादायक आणि कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात आला आहे. या प्रभागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक, पादचारी तसेच ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. सातत्याने अपघात होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात होती.

या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत गौरव कुल कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा गौरव कुल यांनी कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता, पूर्णपणे स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे तसेच आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याचे काम तातडीने हाती घेतले. त्यांच्या या पुढाकारामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, अपघाताची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईल.

सदर रस्ता हा वर्दळीचा असून या मार्गावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा असते. पावसाळ्यानंतर खड्ड्यांचे प्रमाण वाढल्याने दुचाकीस्वार व चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. अनेक वेळा किरकोळ अपघातही घडले होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन गौरव कुल यांनी सामाजिक बांधिलकी जपत तात्काळ उपाययोजना केली.

दरम्यान, याच प्रभागातील नगरसेविका उज्वला परकाळे यांनी देखील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत मुख्य रस्त्यावर साचलेल्या कचऱ्याची दखल घेतली. त्यांनी कचरा कामगारांना तातडीने पाचारण करून रस्त्याची साफसफाई करून घेतली. त्यामुळे परिसर अधिक स्वच्छ, आरोग्यदायी व सुरक्षित झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी गौरव कुल व नगरसेविका उज्वला परकाळे यांच्या या संयुक्त प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले आहे. शासनाकडून निधी येण्याची वाट न पाहता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी स्वखर्चातून काम करणे हे खरंच स्तुत्य आहे, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

नागरिकांच्या दैनंदिन अडचणी समजून घेऊन करण्यात आलेले हे उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरत असून, इतरांनीही यापासून प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!