Homeताज्या बातम्याAhilyanagar Municipal Election : अहिल्यानगर महापालिका निवडणूकित शिंदेसेनेला मोठा धक्का, पाच उमेदवारांचे...

Ahilyanagar Municipal Election : अहिल्यानगर महापालिका निवडणूकित शिंदेसेनेला मोठा धक्का, पाच उमेदवारांचे अर्ज बाद

Times of Maharashtra Desk: अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. सर्वाधिक म्हणजे 54 उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या शिंदेसेनेच्या पाच उमेदवारांचे अर्ज छाननीअंती अवैध ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे निवडणूक रिंगणात शिंदेसेनेचे अधिकृत उमेदवार आता 49 वर आले असून, निवडणुकीपूर्वीच हा पक्षासाठी मोठा झटका मानला जात आहे.

अहिल्यानगर महापालिकेच्या एकूण 68 जागांसाठी तब्बल 788 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी विविध निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननीदरम्यान एकूण 17 उमेदवारी अर्ज अवैध ठरवून बाद करण्यात आले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

तांत्रिक कारणांमुळे पाच अर्ज बाद

शिंदेसेनेच्या पाच उमेदवारांचे अर्ज विविध तांत्रिक कारणांमुळे बाद ठरले. एका उमेदवाराचा अर्ज अनुमोदकाच्या चुकीच्या स्वाक्षरीमुळे अवैध ठरवण्यात आला. एका उमेदवाराने एबी फॉर्म सादर केला नव्हता, तर एका उमेदवाराने एबी फॉर्मची केवळ झेरॉक्स प्रत जोडली होती. याशिवाय दोन उमेदवारांच्या अर्जांमध्ये एबी फॉर्मवर खाडाखोड व व्हाईटनरचा वापर केल्याचे आढळून आल्याने ते अर्जही बाद करण्यात आले. ऐनवेळी पक्षप्रवेश केलेल्या काही उमेदवारांच्या कागदपत्रांमध्ये तांत्रिक त्रुटी राहिल्याचे छाननीदरम्यान स्पष्ट झाले.

विविध पक्षांचे मोठ्या संख्येने अर्ज

या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), एमआयएम, आम आदमी पार्टी, बसपा तसेच अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले होते. सावेडी तहसील कार्यालय, जुने महापालिका कार्यालय, भूसंपादन कार्यालय, बुरुडगाव प्रभाग समिती, केडगाव उपकार्यालय अशा विविध ठिकाणी उमेदवार, सूचक व अनुमोदकांच्या उपस्थितीत छाननी प्रक्रिया पार पडली.

शरद पवार गटाचाही एक अर्ज अवैध

छाननीदरम्यान काही उमेदवारांविरोधात अतिक्रमण, महापालिकेची करथकबाकी, तसेच कागदपत्रांतील त्रुटींबाबत हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. बहुतांश हरकती फेटाळण्यात आल्या असल्या तरी तांत्रिक त्रुटी असलेल्या अर्जांबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या एका उमेदवाराचाही अर्ज अवैध ठरवण्यात आला आहे.

माघारीनंतरच स्पष्ट होणार अंतिम चित्र

दरम्यान, शिंदेसेनेच्या ज्या उमेदवारांचे पक्षीय अर्ज बाद झाले आहेत, त्यांचे अपक्ष म्हणून दाखल केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज माघारीचा कालावधी आजपासून सुरू झाला असून 2 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे कोणते उमेदवार माघार घेतात आणि कोणत्या प्रभागात थेट लढती होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. माघारीनंतरच अहिल्यानगर महापालिकेतील अंतिम राजकीय समीकरण स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!