Homeदेश-विदेशभारत–पाकिस्तान तणावावर चीनचा दावा; भारताकडून स्पष्ट नकार

भारत–पाकिस्तान तणावावर चीनचा दावा; भारताकडून स्पष्ट नकार

Times of Maharashtra : भारत आणि पाकिस्तान यांच्यात यावर्षी निर्माण झालेल्या लष्करी तणावाबाबत आता चीननेही मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केल्यानंतर आता चीनकडूनही तसाच दावा करण्यात आला असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. मात्र भारत सरकारने चीनचा हा दावा ठामपणे फेटाळून लावला आहे.
मंगळवारी बीजिंग येथे झालेल्या एका कार्यक्रमात चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी सांगितले की, चीन जगातील विविध संघर्ष शांततेने सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या काळातही चीनने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी भूमिका बजावल्याचे त्यांनी म्हटले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने वांग यी यांच्या या वक्तव्याचा प्रचार सोशल मीडियावर केला आहे.

यावर भारत सरकारने प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, भारत–पाकिस्तान तणाव निवळण्यात कोणत्याही तृतीय देशाचा हस्तक्षेप नव्हता. हा प्रश्न दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमधील थेट संवादातूनच सुटला, असे भारताचे म्हणणे आहे.
सदर तणाव मे महिन्यात उफाळून आला होता. या काळात भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ आणि काही लष्करी ठिकाणांवर लक्ष्य केंद्रित कारवाई केली होती. या कारवाईत पाकिस्तानच्या सुमारे ११ हवाई तळांना नुकसान झाल्याचे सांगितले जाते.

ही कारवाई जम्मू–काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली होती. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता.
भारत सरकार यापूर्वीही अनेक वेळा स्पष्ट करीत आली आहे की, या संघर्षात कोणत्याही देशाने मध्यस्थी केलेली नाही. भारताच्या मते, मोठे नुकसान झाल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी स्वतःहून भारताशी संपर्क साधला होता. पाकिस्तानचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (DGMO) यांनी भारतीय DGMO यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर १० मेपासून जमीन, हवा आणि समुद्रातील सर्व प्रकारच्या लष्करी कारवाया थांबवण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली.

चीनच्या या नव्या दाव्यानंतर त्याच्या भूमिकेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. चीन आणि पाकिस्तान यांचे संबंध अतिशय जवळचे मानले जातात. पाकिस्तानला सर्वाधिक शस्त्रसामग्री पुरवणाऱ्या देशांमध्ये चीन आघाडीवर आहे. त्यामुळे या प्रकरणात चीन कितपत निष्पक्ष राहू शकतो, यावरही चर्चा सुरू झाली आहे.
चीनवर चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप
दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात प्रसिद्ध झालेल्या एका अमेरिकन अहवालात चीनवर गंभीर आरोप करण्यात आले होते. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर चीनकडून सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा या अहवालात करण्यात आला होता.

या अहवालानुसार, बनावट सोशल मीडिया खात्यांच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) साहाय्याने तयार केलेल्या खोट्या छायाचित्रांचा प्रसार करण्यात आला. यामागचा उद्देश भारत वापरत असलेल्या फ्रान्सनिर्मित राफेल लढाऊ विमानांची प्रतिमा खराब करणे आणि चीनच्या J-35 विमानाचा प्रचार करणे हा होता.
राजनैतिक पातळीवर पाहता, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केलेल्या दिवशीच चीनने संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. मात्र त्याच वेळी चीनने भारताच्या लष्करी कारवाईबाबत चिंता व्यक्त करत परिस्थितीवर लक्ष ठेवत असल्याचेही नमूद केले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!