Homeताज्या बातम्याPune Municipal Election : पुणे महानगरपालिका निवडणूक 2026: एबी फॉर्म प्रकरणामुळे राजकीय...

Pune Municipal Election : पुणे महानगरपालिका निवडणूक 2026: एबी फॉर्म प्रकरणामुळे राजकीय खळबळ, उद्धव कांबळेंविरोधात गुन्हा दाखल

Times of Maharashtra Desk: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात अनेक ठिकाणी गोंधळ, नाराजी आणि वादाचे प्रकार समोर येत आहेत. अशाच एका धक्कादायक घटनेमुळे पुण्यातील प्रभाग क्रमांक 36 चर्चेत आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटातील उमेदवार उद्धव कांबळे यांच्यावर पक्षाचा एबी फॉर्म फाडून गिळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहराच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

पद्मावती परिसरातील प्रभाग क्रमांक 36 मधून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून सुरुवातीला मच्छिंद्र ढवळे यांना ड गटातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी मंगळवारी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म जोडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्याच दिवशी उद्धव कांबळे यांनाही पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आल्याने एकाच पक्षाचे दोन उमेदवार समोरासमोर उभे राहिले. अर्ज छाननीदरम्यान मच्छिंद्र ढवळे यांचा अर्ज आधी दाखल झाल्यामुळे तो वैध ठरण्याची शक्यता लक्षात येताच उद्धव कांबळे कात्रज येथील क्षेत्रीय निवडणूक कार्यालयात पोहोचले. नियमांनुसार अर्ज पाहण्याचा अधिकार असल्याने कर्मचाऱ्यांनी अर्जांचा गठ्ठा त्यांच्याकडे दिला. याचवेळी उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांच्या अर्जासोबत जोडलेला एबी फॉर्म फाडला आणि तो नष्ट केल्याचा आरोप आहे.

निवडणूक कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तो फॉर्म तोंडात टाकून गिळल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारानंतर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा वेल्हा येथील नायब तहसीलदार मनीषा भुतकर यांनी सरकारी कामात अडथळा आणणे व सरकारी दस्तऐवज नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिस कारवाई आणि उमेदवाराची भूमिका
तक्रारीनंतर पोलिसांनी उद्धव कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. घटनेनंतर ते फरार झाल्याची चर्चा होती. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर कांबळे हे स्वतःहून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्यात हजर झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. माध्यमांशी बोलताना उद्धव कांबळे यांनी एबी फॉर्म फाडल्याची कबुली दिली असून मात्र आपण फॉर्म गिळला नसल्याचा दावा केला आहे. “भावनेच्या भरात माझ्याकडून ही चूक झाली. मी ती मान्य करतो. मात्र मच्छिंद्र ढवळे यांचा पक्षाशी कोणताही संबंध नाही. त्यांनी एबी फॉर्म कुठून मिळवला, हे आम्हालाही माहिती नाही. वरिष्ठांनी मला अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट केले होते,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव कांबळे यांना दिली समाज

या प्रकरणाची गंभीर दखल घेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव कांबळे यांना समज दिल्याची माहिती आहे. निवडणूक प्रक्रियेत अशा प्रकारची कृत्ये पक्षाची प्रतिमा मलीन करतात, असा स्पष्ट संदेश पक्ष नेतृत्वाकडून देण्यात आला आहे.दरम्यान, या घटनेमुळे पुणे महानगरपालिका निवडणुकीतील गोंधळ, उमेदवारीवरून होणारे वाद आणि अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा समोर आले असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!