Homeताज्या बातम्याJalgaon Municipal Corporation: जळगावात राजकीय धक्का: शिंदे गटाचा उमेदवार बिनविरोध, राष्ट्रवादीत...

Jalgaon Municipal Corporation: जळगावात राजकीय धक्का: शिंदे गटाचा उमेदवार बिनविरोध, राष्ट्रवादीत खळबळ—महानगरप्रमुखांचा राजीनामा

Times of Maharashtra Desk:राज्यातील महापालिका निवडणुकांतील उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर राजकीय चित्र अधिक स्पष्ट होत असून जळगाव महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 18 अ मधून शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार डॉ. गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित झाली आहे. आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव असलेल्या डॉ. गौरव सोनवणे यांच्या विरोधात उभे असलेले उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना उमेदवार मयूर सोनवणे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली आहे.

या घडामोडीमुळे राज्यात आतापर्यंत भाजपचे 6 आणि शिवसेना (शिंदे गट) चा 1 असे एकूण महायुतीचे 7 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. शिंदे गटाने यानिमित्ताने या निवडणुकीत आपले खाते उघडले आहे.

1038 अर्जांची छाननी, 135 बाद

जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 1038 उमेदवारी अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली. यामध्ये 19 प्रभागांतील 135 अर्ज बाद ठरवण्यात आले असून 903 अर्ज वैध घोषित करण्यात आले आहेत. छाननीदरम्यान तांत्रिक त्रुटी आणि पक्षांतर्गत समन्वयाअभावी अनेक दिग्गज उमेदवारांना फटका बसला. यामध्ये भाजपच्या माजी महापौर जयश्री धांडे यांचा अर्ज एबी फॉर्मवर स्वाक्षरी नसल्यामुळे रद्द करण्यात आला. मात्र, त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्या आता भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असतील.

भाजप, शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध
राज्यात भाजपचे कल्याण-डोंबिवलीत 3, पनवेलमध्ये 1 आणि धुळ्यात 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यानंतर आता जळगावात शिवसेना (शिंदे गट) चा उमेदवार बिनविरोध झाल्याने महायुतीला मोठा दिलासा मिळाला आहे. आमदारपुत्र बिनविरोध झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राष्ट्रवादीत खळबळ, महानगरप्रमुखांचा राजीनामा
जळगाव मनपा निवडणुकीत माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांवर आपल्या कुटुंबीयांना उमेदवारी देण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट ‘विकल्याचा’ गंभीर आरोप करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महानगरप्रमुख अभिषेक पाटील यांनी अजित पवार यांना लेखी पत्र देत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या पत्रात त्यांनी देवकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!