३५ वर्षांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आणखी एक सामाजिक परंपरा; भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश

पंढरपूर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) बीड तालुक्यातील राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त आदर्शगाव वंजारवाडीने सामाजिक, धार्मिक आणि संस्कारक्षम उपक्रमांची परंपरा कायम ठेवत यंदाही हरिपाठातील लहान मुले-मुली, महिला व ग्रामस्थांसाठी निशुल्क पंढरपूर वारीचे आयोजन केले. या उपक्रमाचे नेतृत्व आदर्शगावचे प्रेरणादायी सरपंच मा. श्री. वैजिनाथ (नाना) तांदळे यांनी केले असून, त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

गेल्या ३५ वर्षांपासून बिनविरोध सरपंच म्हणून कार्यरत असलेले वैजिनाथ नाना तांदळे यांनी वंजारवाडीला विकास, पर्यावरण संवर्धन, शिक्षण, सामाजिक सलोखा आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडवून राज्यभर आदर्श निर्माण केला आहे. दर महिन्याच्या एकादशीला गावात हरिपाठ, सामूहिक नामस्मरण आणि सहभोजनाचा उपक्रम नियमित राबविला जातो. याच हरिपाठातील बालकांना आणि ग्रामस्थांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ मिळावा, या उद्देशाने त्यांनी निशुल्क पंढरपूर वारी आयोजित केली.
वारीदरम्यान “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल”, “नगद नारायण महाराज की जय” आणि “भगवान बाबा की जय” अशा जयघोषांनी परिसर भक्तिमय झाला. लहान मुलांमध्ये भक्तीचे संस्कार रुजावेत, समाजात एकोपा वाढावा आणि वारकरी परंपरेचे जतन व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या प्रसंगी श्री. लक्ष्मणराव पवार, सोमिनाथ सर, पांडुरंग नाना राख, दयावान सर, शहादेव नाना, बाबासाहेब चव्हाण, नारायण तांदळे, संजय तांदळे, गोविंद तांदळे, आचन पवार, शरद झांझुर्णे, गजानन तांदळे, अंकुश तांदळे, प्रदीप पवार, अर्जुन पवार, बाबू पवार, अमर तांदळे, कुमार पवार, ज्ञानोबा झांझुर्णे, तात्याराम बापू, अशोक तांदळे, ओमकार कांबळे, कान्हू तांदळे, मारुती कुटे, सौ. मिराकाकू तांदळे, सौ. सुरेखा तांदळे, सौ. अनुसया तांदळे, सौ. शारदा राख, सौ. पुष्पा कुटे यांच्यासह हरिपाठातील सर्व मुले-मुली, महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदर्शगाव वंजारवाडीने विकासाबरोबरच अध्यात्म, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशा उपक्रमांमुळे राज्यभर वेगळी ओळख निर्माण केली असून, सरपंच वैजिनाथ नाना तांदळे यांच्या नेतृत्वाखाली गावाची आदर्श वाटचाल अधिकच प्रेरणादायी ठरत आहे.






















