Homeताज्या बातम्या2026 च्या सुरुवातीलाच चांदी चमकली, सोन्यानेही घेतली झेप: सोने-चांदीच्या दरात मोठी तेजी

2026 च्या सुरुवातीलाच चांदी चमकली, सोन्यानेही घेतली झेप: सोने-चांदीच्या दरात मोठी तेजी

Times of Maharashtra Desk: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीच्या दरात 7 हजार रुपयांहून अधिक वाढ झाली असून सोन्याचे दरही हजार रुपयांपेक्षा जास्त वाढले आहेत. MCX वर सकाळी 11.25 वाजता 5 मार्चच्या वायद्याचे चांदीचे दर 7,468 रुपयांनी वाढून 2,43,341 रुपये प्रति किलो इतके झाले. तर 5 फेब्रुवारीच्या वायद्याचे सोन्याचे दर 1,011 रुपयांनी वाढून 1,36,815 रुपये प्रति तोळा या पातळीवर पोहोचले आहेत.

2025 मध्ये सोने-चांदीत मोठी वाढ
कमोडिटी बाजारातील जाणकारांच्या मते, 2025 मध्ये चांदीच्या दरात तब्बल 150 टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून, सोन्याच्या दरात सुमारे 70 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. गुंतवणूकदारांमधील सतर्कता आणि जागतिक अनिश्चिततेमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीकडे कल वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चांदीच्या दरात वाढ का होतेय?

चीनने 1 जानेवारी 2026 पासून चांदीच्या निर्यातीवर कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरकारी परवानगीशिवाय चांदीची निर्यात करता येणार नाही. तसेच कोणत्याही खासगी कंपनीला थेट चांदी निर्यात करण्यास मनाई करण्यात आली आहे.
जागतिक बाजारात चीनचा चांदीवर 60 ते 70 टक्के थेट किंवा अप्रत्यक्ष प्रभाव असल्याने, या निर्णयाचा परिणाम जागतिक स्तरावर चांदीच्या मागणीत वाढ होण्याच्या स्वरूपात दिसून येत आहे.

उच्चांकानंतर किंचित घसरण
सोन्याने अलीकडेच 1,40,465 रुपयांचा उच्चांक गाठला होता, त्यानंतर दर कमी होऊन सध्या 1,36,815 रुपये इतके आहेत. तर चांदीने 2,54,174 रुपयांचा उच्चांक गाठल्यानंतर सध्या दर 2,43,341 रुपये या पातळीवर आहेत.

सराफा बाजारातील आजचे दर
सराफा बाजारातही सोने-चांदीच्या दरात तेजी कायम आहे.चांदीचा दर 5,656 रुपयांनी वाढून 2,34,906 रुपये प्रति किलो झाला असून, GST सह दर 2,41,953 रुपये आहेत.
सोन्याचा GST सह दर 1,38,447 रुपये प्रति तोळा असून, GST शिवाय दर 1,34,415 रुपये आहे.

कॅरेटप्रमाणे सोन्याचे दर

23 कॅरेट : 1,33,877 रुपये (950 रुपयांची वाढ)

22 कॅरेट : 1,23,124 रुपये (874 रुपयांची वाढ)

18 कॅरेट : 1,00,811 रुपये (715 रुपयांची वाढ)

14 कॅरेट : 78,633 रुपये (558 रुपयांची वाढ)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!