Homeक्राईमपिंपळा परिसरात खुनानंतर तणाव; निष्पाप तरुणाचा बळी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

पिंपळा परिसरात खुनानंतर तणाव; निष्पाप तरुणाचा बळी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

विनोद पवार (जळगाव प्रतिनिधी) : शहरातील पिंपळा परिसरात किरकोळ वादाचे गंभीर पर्यवसान होऊन एका तरुणाचा जीव गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिंपळा येथील प्रशांत पाटील चौकात १ फेब्रुवारी रोजी झालेल्या क्षुल्लक वादातून २२ वर्षीय शुभम गजानन सपकाळे याच्यावर काही तरुणांनी निर्घृण हल्ला केला होता. आरोपींनी शुभमला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लाकडी दांडक्याने डोक्यावर व पाठीवर जोरदार वार केले. या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाला.

घटनेनंतर जखमी अवस्थेत शुभमला तातडीने उपचारासाठी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच शुभमने प्राण सोडले. या दुर्दैवी घटनेमुळे सपकाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात सुरुवातीला मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, शुभमचा मृत्यू झाल्यानंतर आता या गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृत्यूची बातमी समजताच पिंपळा परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गंगुळे आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

या प्रकरणात आतापर्यंत दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी दोन आरोपी फरार आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश माळी करत आहेत.

निष्पाप तरुणाचा अशा पद्धतीने बळी गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना असून सर्व आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!