Homeताज्या बातम्यामुंबई महापालिका महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; राजकीय हालचालींना वेग

मुंबई महापालिका महापौर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; राजकीय हालचालींना वेग

Times Of Maharashtra Desk : मुंबई महापालिका महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम खेर ठरला आहे. ७ फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी अर्ज स्विकारले जाणार आहेत. तर ११ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची घोषणा करण्यात येणार आहे. मात्र याआधी एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबत लढणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महायुतीला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. अजित रावराणे यांच्याकडून मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्यात आला आहे.

मुंबईत ८९ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष
देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि तब्बल २५ वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजपयुतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावली. ८९ जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ६५ जागा मिळाल्यात. शिंदेंच्या शिवसेनेला२९ , काँग्रेसला २४,मनसेला ६, एमआयएमला ८,राष्ट्रवादी अजित पवार गटाला ३, राष्ट्रवादी शरद पवार गटाला १,समाजवादी पार्टीला २ जागा जिंकल्या.

१५ फेब्रुवारीपर्यंत मुंबई सोडू नका, नगरसेवकांना निर्देश-
मुंबई महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. ११ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीआधी सर्वच पक्षांनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतच थांबण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत मतदानाच्या आधी शहर सोडू नये, असे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान ९ फेब्रुवारीला होणाऱ्या आंगणेवाडीच्या जत्रेमुळे कोकण पट्ट्यातील काही नगरसेवक बाहेरगावी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याची दखल घेत पक्षांकडून अतिरिक्त सावधगिरी बाळगली जात आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसतानाही त्यांनी खबरदारीचा पवित्रा घेत नगरसेवकांना १५ फेब्रुवारीपर्यंत मुंबई सोडू नका, असे निर्देश दिले आहेत.

भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) गटाकडूनही आपल्या नगरसेवकांना तत्सम आदेश देण्यात आले आहेत.८ फेब्रुवारीला रविवार असल्याने काही नगरसेवक जत्रेसाठी रवाना होण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी, १० फेब्रुवारीपर्यंत अनिवार्यपणे मुंबईत हजर राहा, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. महापौर निवडणूक तोंडावर असताना संख्या अबाधित ठेवण्यासाठी सर्वच पक्षांनी नगरसेवकांवर लक्ष केंद्रीत केल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबईतील राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-
भाजप – ८९
शिवसेना ठाकरे गट- ६५
शिवसेना – २९
काँग्रेस – २४
मनसे -६
एमआयएम- ८
एनसीपी -3
एसपी -२
एनसीपी शप – १
————-
एकूण- 227

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!