Homeमहत्त्वाचेविधानपरिषदेतील रिक्त जागांवर लवकरच निर्णय; जो पक्षासाठी राबला त्यालाच मिळणार संधी.

विधानपरिषदेतील रिक्त जागांवर लवकरच निर्णय; जो पक्षासाठी राबला त्यालाच मिळणार संधी.

Times Of Maharashtra Desk:महाराष्ट्र विधानपरिषदेतील राज्यपाल कोट्यातील पाच रिक्त जागा भरण्याच्या हालचालींना वेग आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या नियुक्त्यांमध्ये प्राधान्य दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या पाच जागांवर नेमकी कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

विधानपरिषद- यांचा कार्यकाल १३ मे रोजी संपणार. 

महाराष्ट्र विधानपरिषद ही कायमस्वरूपी सभागृह असून तिची एकूण सदस्यसंख्या ७८ आहे. सध्या ५५ सदस्य कार्यरत असून २३ जागा रिक्त आहेत. दरम्यान, १४ मे २०२६ रोजी आणखी ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. या जागा विधानसभेतील आमदारांकडून निवडून दिलेल्या सदस्यांच्या आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे, राजेश राठोड, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांचा समावेश आहे. त्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपणार आहे.

सध्या विधानसभेत २८६ आमदार असल्यामुळे या निवडणुकीत अंदाजे ३६ आमदारांचा मतदानाचा कोटा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे विविध पक्षांकडून राजकीय गणिते मांडली जात आहेत.

विधानपरिषदेच्या रचनेनुसार, ७८ सदस्यांपैकी ३० सदस्य विधानसभेतील आमदारांकडून निवडले जातात. २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून निवडले जातात. शिक्षक मतदारसंघातून ७, पदवीधर मतदारसंघातून ७ सदस्य निवडले जातात, तर साहित्य, कला, सहकार आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील १२ सदस्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.
राज्यसभा – यांचा कार्यकाल संपणार!
दरम्यान, राज्यसभेच्याही निवडणुकीचे गणित रंगू लागले आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या एकूण ७ जागा २ एप्रिल २०२६ रोजी रिक्त होणार आहेत. यात शरद पवार, रामदास आठवले , भागवत कराड, धैर्यशील पाटील  प्रियंका चतुर्वेदी , रजनी पाटीलआणि फौजिया खान  यांचा समावेश आहे.

विधानपरिषद आणि राज्यसभा या दोन्ही पातळ्यांवरील रिक्त जागांमुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता असून, विविध पक्षांमध्ये उमेदवारीसाठी चुरस वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!