Homeमहाराष्ट्रगटई स्टॉल योजनेंतर्गत कामगारांना 100 टक्के अनुदानावर स्टॉल

गटई स्टॉल योजनेंतर्गत कामगारांना 100 टक्के अनुदानावर स्टॉल

28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

यवतमाळ प्रतिनिधी : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जातीतील चर्मकार समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘गटई स्टॉल योजना’ अंतर्गत सन 2025-26 या वर्षासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. चर्मकार, ढोर, होलार, मोची आदी समाजघटकांचे आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक जीवनमान उंचावून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने ही योजना सन 1997 पासून कार्यान्वित आहे.

या योजनेंतर्गत महानगरपालिका, नगरपालिका, छावणी क्षेत्र तसेच ग्रामपंचायत क्षेत्रातील पात्र गटई कामगारांना 100 टक्के शासकीय अनुदानावर लोखंडी पत्र्याचे स्टॉल देण्यात येणार असून त्यासोबतच ५ हजार रुपयांचे रोख अनुदानही प्रदान करण्यात येणार आहे.

पात्रतेच्या अटी पुढीलप्रमाणे :

अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा.

ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 80 हजार रुपयांपर्यंत, तर शहरी भागातील उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत असावे.

अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.

ज्या जागेसाठी स्टॉलची मागणी केली आहे ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका किंवा छावणी बोर्डाकडून अधिकृतरित्या भाडे, करार, खरेदी किंवा मोफत ताब्यात दिलेली अथवा अर्जदाराच्या स्वमालकीची असणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील पात्र व गरजू गटई कामगारांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, पळसवाडी कॅम्प, यवतमाळ येथून अर्ज विनामूल्य प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह 28 फेब्रुवारीपर्यंत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मंगला मून यांनी केले आहे.

ही योजना गरजू कामगारांसाठी आर्थिक स्वावलंबनाची मोठी संधी ठरणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!