Taims Of Maharashtra Disk : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण जाहीर15 महापालिकांवर महिला महापौर, 14 ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गांना संधी.
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आले. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत महापौरपदासाठीची आरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर व आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून आनंद परांजपे उपस्थित होते.
शिवसेनेचा (उबाठा )आक्षेप
शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मात्र या आरक्षण सोडत पद्धतीवर आक्षेप नोंदविला राज्यात लागू असलेल्या 50 टक्के महिला आरक्षणाच्या नियमानुसार 15 महानगरपालिकांमध्ये महिला महापौर होणार आहेत, तर उर्वरित 14 महानगरपालिकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी महापौरपद खुले राहणार आहे. महिला आरक्षणांतर्गत 4 महानगरपालिकांमध्ये ओबीसी महिलांसाठी, तर 9 महानगरपालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले होते, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी झाली होती. त्यानंतर आज महापौरपदासाठी आरक्षणाची अंतिम सोडत जाहीर करण्यात आली.
महापौरपदासाठी प्रवर्गनिहाय आरक्षण
-
अनुसूचित जमाती (ST) – 1
-
अनुसूचित जाती (SC) – 3
-
नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC) – 8
-
सर्वसाधारण – 17
कोणत्या महानगरपालिकेसाठी कोणते आरक्षण?
1 बृहन्मुंबई (BMC) सर्वसाधारण- महिला
2 ठाणे अनुसूचित जाती (एससी)
3 कल्याण-डोंबिवली अनुसूचित जमाती- एसटी (पुरुष)
4 नवी मुंबई सर्वसाधारण- महिला
5 वसई-विरार सर्वसाधारण-महिला / पुरूष
6 भिवंडी-निजामपूर सर्वसाधारण- महिला / पुरूष
7 मीरा-भाईंदर सर्वसाधारण- महिला
8 उल्हासनगर ओबीसी- महिला किंवा पुरूष
9 पुणे सर्वसाधारण- महिला
10 पिंपरी-चिंचवड सर्वसाधारण- महिला / पुरूष
11 नागपूर सर्वसाधारण
12 अहिल्यानगर ओबीसी- महिला
13 नाशिक सर्वसाधारण- महिला
14 छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण-महिला किंवा पुरुष
15 अकोला ओबीसी-महिला
16 अमरावती सर्वसाधारण- महिला किंवा पुरुष
17 लातूर अनुसूचित जाती (एससी)- महिला
18 नांदेड-वाघाळा सर्वसाधारण-महिला
19 चंद्रपूर ओबीसी- महिला
20 धुळे सर्वसाधारण- महिला
21 जळगाव ओबीसी- महिला
22 मालेगाव सर्वसाधारण-महिला
23 कोल्हापूर ओबीसी-महिला किंवा पुरूष
24 सांगली-मिरज-कुपवाड सर्वसाधारण
25 सोलापूर सर्वसाधारण-महिला / पुरूष
26 इचलकरंजी ओबीसी- महिला किंवा पुरूष
27 जालना अनुसूचित जाती (एससी)- महिला
28 पनवेल ओबीसी- महिला किंवा पुरूष
29 परभणी सर्वसाधारण-महिला / पुरूष






















