Times Of Maharashtra Desk : पत्रकारिता क्षेत्रातील आघाडीचे नाव असलेल्या ‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज’ या समूहाच्या पुणे शहर प्रतिनिधीपदी श्री. एम. एम. शेख (रा. कॅम्प, पुणे) यांची आज अधिकृतरीत्या निवड करण्यात आली आहे. ‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज’चे मुख्य संपादक मुज्जम्मील शेख यांनी त्यांना याबाबतचे नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सन्मान केला.
पुणे शहरातील विविध घडामोडी, दैनंदिन बातम्या आणि सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी श्री. शेख यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकारितेच्या नीतीमत्तेचे पालन करून समाजातील उपेक्षित घटकांचा आवाज बनण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
पुणे शहराचे प्रतिनिधी म्हणून काम करताना जनतेच्या समस्यांना वाचा फोडणे आणि प्रशासनापर्यंत पोहोचवणे, हे आपले मुख्य उद्दिष्ट असेल, असा विश्वास एम. एम. शेख यांनी यावेळी व्यक्त केला.
श्री. शेख यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस आणि उज्ज्वल कार्यासाठी ‘टाईम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज’ परिवाराकडून व मित्रपरिवाराकडून भरभरून शुभेच्छा देण्यात येत आहेत.






















