Homeताज्या बातम्याMaharashtra Municipal Elections 2026 “पुणे–पिंपरीत भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी; काका–पुतण्यांच्या युतीची...

Maharashtra Municipal Elections 2026 “पुणे–पिंपरीत भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी; काका–पुतण्यांच्या युतीची राजकीय रंगत”

Times of Maharashtra Desk: राज्यातील आगामी महापालिका निवडणूक 2026 संदर्भात राजकीय हालचालींना वेग आला आहे. बहुतांश महापालिकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असल्या तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र लढू शकत नाही. याबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. दोन्ही पक्ष एकत्र आले तर त्याचा फायदा विरोधकांना होईल, हे आम्हा दोघांनाही राजकारण कळतं. त्यामुळे ही लढत मैत्रीपूर्ण असेल.”

अजित पवारांनी दिली प्रतीक्रिया
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडबाबत विचार करूनच भाष्य केलं असेल. या दोन्ही महापालिकांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी मी सगळं पणाला लावणार आहे.”शरद पवार यांच्यासोबत संभाव्य युतीबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले, “थोडी कळ काढा. आताच निवडणुका जाहीर झाल्या आहेत.” त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत अद्याप स्पष्टता दिसून येत नाही.

पुण्यात काका–पुतण्यांची युती होणार?
महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच पिंपरी-चिंचवडमध्ये काका–पुतणे एकत्र येणार का? याबाबत चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार गटाचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार गटाच्या कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे यांची महत्त्वाची बैठक पार पडली. दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये ही पहिलीच औपचारिक चर्चा मानली जात आहे.नाना काटे यांनी सांगितले की, “काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी मला फोन करून पिंपरी-चिंचवडमध्ये मतविभाजन टाळण्याचा सल्ला दिला होता.” ही बैठक अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसारच घेण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

महापालिका निवडणूक वेळापत्रक

  • नामनिर्देशन अर्ज स्वीकारणे: 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
  • अर्ज छाननी: 31 डिसेंबर
  • उमेदवारी माघार: 2 जानेवारी
  • चिन्ह वाटप व अंतिम उमेदवार यादी: 3 जानेवारी
  • मतदान: 15 जानेवारी
  • निकाल: 16 जानेवारी

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक यंदा बहुरंगी आणि अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत असून, आगामी काळात राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!