Homeताज्या बातम्याबृहन्मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान; तर १६ ला निकाल; दिग्गजांची...

बृहन्मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान; तर १६ ला निकाल; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Times of Maharashtra Desk, Mumbai: राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिकेसह एकूण २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, यासाठी कालपासून संबंधित सर्व महापालिका क्षेत्रांत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकांमध्ये एकूण २ हजार ८६९ जागांसाठी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची अधिसूचना १६ डिसेंबर २०२५ रोजी, तर उर्वरित २८ महानगरपालिकांची अधिसूचना १८ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व २८ महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहेत.

या निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे २९० निवडणूक निर्णय अधिकारी, ८७० सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जवळपास १ लाख ९६ हजार ६०५ निवडणूक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.

उमेदवारांसाठी खर्च मर्यादा

निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या प्रचार खर्चावर मर्यादा निश्चित केली असून,

बृहन्मुंबई तसेच ‘अ’ वर्ग महानगरपालिका (पुणे, नागपूर) – १५ लाख रुपये
‘ब’ वर्ग महानगरपालिका (पिंपरी-चिंचवड, नाशिक, ठाणे) – १३ लाख रुपये
‘क’ वर्ग महानगरपालिका (कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, वसई-विरार) – ११ लाख रुपये
‘ड’ वर्ग महानगरपालिका (उर्वरित सर्व) १९ – ९ लाख रुपये इतकी खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे.

महत्वाच्या तारखा

नामनिर्देशनपत्र दाखल करणे
२३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५

नामनिर्देशनपत्रांची छाननी
३१ डिसेंबर २०२५

उमेदवारी माघारीची अंतिम मुदत
०२ जानेवारी २०२६

निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम यादी
०३ जानेवारी २०२६

मतदान
१५ जानेवारी २०२६

मतमोजणी
१६ जानेवारी २०२६

महापालिका निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापणार असून, मुंबईसह सर्व प्रमुख शहरांमध्ये प्रचाराला लवकरच वेग येण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकतर्फे १०५ कर्मचाऱ्यांसाठी मोफत फायब्रोस्कॅन तपासणीद्वारे जनजागृती

0
११ जून २०२६, पुणे: जागतिक फॅटी लिव्हर दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि जीआय एंडोस्कोपी विभागातर्फे कॅन्सर सेंटर, रुबी हॉल क्लिनिक येथे हॉस्पिटल कर्मचारी...

error: Content is protected !!