Homeताज्या बातम्यापिंपरी-चिंचवडच्या आखाड्यात राजकीय कुस्ती; महेश लांडगे–अजित पवार आमनेसामने

पिंपरी-चिंचवडच्या आखाड्यात राजकीय कुस्ती; महेश लांडगे–अजित पवार आमनेसामने

Times of Maharashtra Desk:भाजपचे आमदार पैलवान महेश लांडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाद चांगलाच चिघळल्याचे चित्र सध्या पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात दिसून येत आहे. एकमेकांवर केलेल्या जहरी टीका आणि आक्रमक विधानांमुळे हा संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे.भाजप आमदार महेश लांडगे यांनी यापूर्वी “अजित पवार हे महाराष्ट्राचे आका आहेत,” अशी टीका केली होती. त्यावर अजित पवार यांनी थोडक्यात प्रतिक्रिया देत विषय संपवला होता. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा लांडगेंनी अजित पवारांवर थेट निशाणा साधत वादाला नवे वळण दिले आहे.

“घोटाळे काढणारेही जमा होतात” – लांडगेंचा हल्लाबोल
महेश लांडगे यांनी एका कार्यक्रमात बोलताना अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर गंभीर आरोप केले.
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 70 हजार कोटींच्या घोटाळ्यावर शिक्षा होईल असे म्हटले आणि संध्याकाळी तेच लोक भाजपमध्ये दाखल झाले. देवा भाऊ (देवेंद्र फडणवीस) इशारा देतात तेव्हा आपले घोटाळे काढणारेही जमा होतात,” असा टोला लांडगेंनी लगावला. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी लांडगेंचा उल्लेख ‘भ्रष्टाचाराचा आका’ असा केल्यानंतर लांडगे आक्रमक झाले.
“तू आमचा कार्यक्रम करणार म्हणतोस, मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का? आमच्या नादी लागू नको,” अशा एकेरी भाषेत त्यांनी टीका केली. तसेच “आता डोक्यात गदा घालण्याची वेळ आली आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.

“अजित पवारच महाराष्ट्राचे आका” – लांडगेंचा पलटवार
लांडगेंनी पुढे बोलताना अजित पवारांवर वैयक्तिक पातळीवर टीका करत म्हटले,
“तुम्ही स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आलात. आधी स्वतःच्या लेकाचे पराक्रम पाहा. मुळात तुम्हीच महाराष्ट्राचे आका आहात, हे जाहीर करा.”“मला पिंपरी-चिंचवडचा आका म्हणतायेत, पण तेच महाराष्ट्राचे आका आहेत,” असा पलटवार करत लांडगेंनी अजित पवारांना थेट ‘कुस्तीचे आव्हान’ दिले“पूर्वीचे वस्ताद अजितदादा विरुद्ध. पैलवान महेश दादा अशी लढाई आता पिंपरी-चिंचवडच्या आखाड्यात सुरू झाली आहे,” असेही ते म्हणाले.अजित पवार सध्या नैराश्यात असून त्यांचा अहंकार बोलत असल्याचा आरोप करत, “पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचाराचा आका संपवायचा आहे,” असे विधान अजित पवारांनी केल्यानंतर आपण निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याचे लांडगेंनी स्पष्ट केले.

अजित पवारांचे प्रत्युत्तर: “मी कोण आहे ते जनता ठरवेल”
महेश लांडगेंच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले “मी कोण आहे, हे जनता ठरवेल. 15 तारखेपर्यंत वेळ द्या, सविस्तर उत्तर देईन.”दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘अलार्म पाच काम’ हे कॅम्पेन सुरू करण्यात आले असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील खड्डे, कचरा, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई आणि गुन्हेगारी या मुद्द्यांवर रॅप सॉंगच्या माध्यमातून भाजपच्या स्थानिक कारभारावर टीका करण्यात आली आहे.याबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले की,“हे गाणे केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारापुरते मर्यादित आहे. राज्य किंवा केंद्र सरकारशी त्याचा कोणताही संबंध नाही.”“कचरा, तुटलेले रस्ते, वाहतूक कोंडी, पाणीटंचाई आणि गुन्हेगारी हे पुण्याचे खरे ‘अलार्म’ आहेत. पालिकेत मोजक्याच लोकांना टेंडर दिले जात असल्याचा फटका थेट नागरिकांना बसतो,” असेही अजित पवार यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!