Homeक्राईमNashik: बोगस शिक्षक भरती घोटाळा: तत्कालीन शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण निलंबित;...

Nashik: बोगस शिक्षक भरती घोटाळा: तत्कालीन शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण निलंबित; संस्थाचालक, शिक्षणाधिकाऱ्यांसह १४ जणांवर गुन्हा दाखल…

Times of Maharashtra Desk, Malegaon: मालेगाव छावणी पोलिस ठाण्यात आरक्षणातील कथित गैरव्यवहार प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली असून १४ जणांविरुद्ध भादंवि व भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही FIR दिनांक ९ डिसेंबर २०२५ रोजी दाखल झाली असून तक्रारदार भगवान खंडू गवळी, वय ५३, उपनिरीक्षक, मालेगाव छावणी पोलिस ठाणे यांनी तक्रार दिली आहे.

काय आहे प्रकरण?

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, गेल्या २०१२ ते २०२५ या काळात विविध पदांसाठी मिळालेल्या तपासणीमध्ये अनेक उमेदवारांनी खोटी माहिती, बनावट जातीचे पुरावे, चुकीची सेवानोंद दाखवून आरक्षणातील जागांवर नियुक्ती मिळवल्याचे आढळून आल्याचे नमूद आहे. ही संपूर्ण प्रक्रिया अनेक वर्षे चालू होती आणि त्याबाबत विविध सरकारी कार्यालयांतून आलेले आदेश, चौकश्या आणि अहवाल तक्रारीसोबत संलग्न करण्यात आले आहेत.

या प्रकरणात खोटी कागदपत्रे, चुकीची माहिती, अधिकाऱ्यांची दिशाभूल, शासन निर्णयांचा चुकीचा अर्थ लावणे, तसेच निवड प्रक्रियेत अनुचित लाभ मिळवणे यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे. FIR मध्ये नमूद झालेल्या १४ आरोपींमध्ये शिक्षक, मंडळ अधिकारी, माजी वेतन तज्ञ, तसेच विभागीय स्तरावरील संबंधित कर्मचारी यांचा समावेश आहे.

तपासात सरकारी अधिकाऱ्यावरही कारवाई

या संपूर्ण प्रकरणाशी संबंधित दस्तऐवजांवरून शासनाने वेगळी कारवाईही केली आहे. दिनांक ४ डिसेंबर २०२५ रोजी बाबासाहेब बबनराव चव्हाण यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्या विरोधात शिस्तभंग व गंभीर अनियमिततेची कारवाई प्रलंबित आहे, विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित केले आहे. निलंबन काळात त्यांना नियमानुसार उपजीविका भत्ता देण्यात येईल, तसेच त्यांनी नाशिक येथील तहसीलदार कार्यालयात हजेरी द्यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत

या घडामोडीनंतर मालेगाव परिसरात तसेच संबंधित विभागांमध्ये खळबळ माजली असून पुढील तपासात आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ब्रह्मा’ बिल्डरचा महाघोटाळा (भाग – १): ‘ब्रह्मा’ बिल्डरचा पुणे महापालिकेला कोट्यवधींचा चुना! एफएसआय...

0
पुणे (संपादक मुज्जम्मील शेख): "पुणे तिथे काय उणे" ही म्हण आता "पुणे तिथे भ्रष्टाचाराचे काय उणे" अशी बदलण्याची वेळ आली आहे. सामान्य पुणेकराने घराच्या बाल्कनीत...

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

error: Content is protected !!