Homeउद्योगएका फांदीला १५ आंबे! दूधवाहीतील शेतकरी प्रवीण मेश्राम यांची आमराई चर्चेत

एका फांदीला १५ आंबे! दूधवाहीतील शेतकरी प्रवीण मेश्राम यांची आमराई चर्चेत

दूधवाही येथील प्रवीण मेश्राम यांच्या बागेत आंब्यांचा बहर; एकाच फांदीला लागली १५ फळे

ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : यंदाच्या कडाक्याच्या उन्हात आणि निसर्गाच्या लहरीपणामध्येही ब्रह्मपुरी तालुक्यातील दूधवाही येथील प्रयोगशील शेतकरी प्रवीण मेश्राम यांच्या आमराईत निसर्गाचा एक आगळावेगळा चमत्कार पाहायला मिळत आहे. मेश्राम यांच्या बागेतील एका आंब्याच्या झाडाला इतका प्रचंड बहर आला आहे की, चक्क एकाच फांदीला १५ आंबे लागले असून दुसऱ्या फांदीला ५ आंबे डोलत आहेत.

दूधवाही गावातील प्रगतशील शेतकरी प्रवीण मेश्राम यांनी आपल्या बागेत आंब्यांची मोठ्या कष्टाने जोपासना केली आहे. साधारणपणे आंब्याच्या एका मोहोरानंतर काही फळे गळून पडतात, मात्र मेश्राम यांच्या झाडावरील एकाच फांदीला तब्बल १५ आंबे सुरक्षितपणे वाढताना दिसत आहेत. त्याच झाडाच्या दुसऱ्या लहान फांदीला ५ आंबे आहेत. एकाच ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने फळे लागल्याने हे दृश्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत.

मेश्राम यांनी या झाडांची योग्य निगा, वेळेवर पाणी आणि सेंद्रिय खतांचा वापर केल्यानेच हा उत्तम निकाल मिळाल्याचे बोलले जात आहे. ‘निसर्गाची ही किमया पाहून आनंद वाटतो, कष्टाचे फळ अशा स्वरूपात मिळाल्याने समाधान आहे’, अशी भावना प्रवीण मेश्राम यांनी व्यक्त केली.

ब्रह्मपुरी परिसरात सध्या या ‘केसर’ ‘ आंब्याच्या झाडाची आणि मेश्राम यांच्या बागेची मोठी चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!