Homeताज्या बातम्यामराठी माणूस फक्त मतांसाठी? मीरा-भाईंदरमध्ये महापौरपदावरून संतापाची लाट

मराठी माणूस फक्त मतांसाठी? मीरा-भाईंदरमध्ये महापौरपदावरून संतापाची लाट

Times Of Maharashtra Desk : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर शहरातील राजकारणाला मोठा आणि वादग्रस्त कलाटणी मिळाली आहे. मराठी महापौर या अस्मितेच्या मुद्द्यावर पेटलेला संघर्ष आता थेट निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. भाजपकडून डिंपल मेहता यांचा महापौरपदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने, एमएमआरमधील पहिला अमराठी महापौर मीरा-भाईंदरला मिळण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे.

या घडामोडीमुळे शहरातील मराठी समाजात तीव्र अस्वस्थता पसरली असून, मराठी एकीकरण समिती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक भूमिकेत उतरले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून मराठी एकीकरण समितीकडून सातत्याने महापौर मराठीच असावा अशी ठाम मागणी लावून धरली जात होती. मागणी मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला होता. मात्र, भाजपने थेट डिंपल मेहता यांचे नाव पुढे करून हा इशारा झुगारल्याचे स्पष्ट चित्र आता समोर आले आहे. विशेष म्हणजे, उपमहापौरपदासाठी भाजपने ध्रुवकिशोर पाटील यांचे नाव जाहीर केले आहे.

भाजपच्या या निर्णयामुळे मराठी समाजात संतापाची लाट उसळली आहे.
मराठी माणसाचा वापर फक्त मतांसाठीच होतो का? असा थेट आणि बोचरा सवाल मराठी एकीकरण समितीने उपस्थित केला आहे. मराठी अस्मितेला डावलल्याचा आरोप करत, भाजपच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर, येत्या 3 तारखेला नेताजी सुभाष चंद्र बोस चौक ते मीरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयापर्यंत उग्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिला आहे. या आंदोलनात मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा सक्रिय सहभाग असणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

एमएमआरमध्ये पहिल्यांदाच अमराठी महापौर होण्याच्या शक्यतेमुळे मीरा-भाईंदरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आगामी आंदोलन किती तीव्र होणार? भाजप आपल्या भूमिकेवर काय स्पष्टीकरण देणार?
याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!