Homeताज्या बातम्याअजित पवारांनंतर राजकीय वारसा पुढे! सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रीपदी एन्ट्री

अजित पवारांनंतर राजकीय वारसा पुढे! सुनेत्रा पवारांची उपमुख्यमंत्रीपदी एन्ट्री

Times Of Maharashtra Desk : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत.

शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाणार आहे.

पडद्यामागची ‘इनसाईड स्टोरी’ काय आहे? शपथविधी आजच का?

अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबात पक्षाची सूत्रे पुन्हा हाती घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. अजित पवारांनी बंड केले तेव्हा ते राजकारणात एकटे पडले होते. एकीकडे अजित पवार आणि दुसरीकडे संपूर्ण पवार कुटुंब अशी स्थिती निर्माण झाली होती.

अशा परिस्थितीत अजित पवारांनी ज्या कष्टाने पक्ष उभा केला, तो टिकवण्याची जबाबदारी पत्नी म्हणून सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली.
सुरुवातीला त्या यासाठी तयार नव्हत्या. मात्र, हे केलं नाही तर अजित पवारांचं स्वप्न अधूरं राहील” या भावनेतून त्यांनी जड अंतःकरणाने होकार दिला.

त्यामुळे आधी पक्ष मजबूत करणे आणि नंतर विलीनीकरणाबाबत चर्चा असा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. याच कारणामुळे आधी शपथविधी आणि त्यानंतर पुढील राजकीय निर्णय असा रोडमॅप ठरवण्यात आला आहे.

सुनेत्रा पवारांकडे कोणती खाती असणार?

अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रिपदासोबत अर्थसह महत्त्वाची खाती होती. मात्र सध्याच्या घडीला-

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ आज

राज्य उत्पादन शुल्क विभाग

क्रीडा विभाग

ही जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे कायम राहणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अर्थ खात्याची जबाबदारी पुन्हा त्यांच्याकडे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आजच्या शपथविधीत फक्त सुनेत्रा पवारच शपथ घेणार असून अन्य कोणताही मंत्री शपथ घेणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!