Homeताज्या बातम्यामुलुंड लोकलमधील प्रा.आलोक सिंग हत्या प्रकरण-'सारे घडीचे प्रवासी' आपण एवढेच करु या.

मुलुंड लोकलमधील प्रा.आलोक सिंग हत्या प्रकरण-‘सारे घडीचे प्रवासी’ आपण एवढेच करु या.

टाइम्स ऑफ महाराष्ट्र- विशेष लेख. 

प्रा.अलोक सिंग यांचा खून : एक दुर्दैवी घटना 
प्रा अलोक सिंग विलेपार्ले नरसी मोंजी कॉमर्स कॉलेज यांचा किरकोळ कारणावरून झालेल्या वादात धारदार शस्त्राने खून करण्यात आला. आरोपी ओंकार शिंदे यास अटक करण्यात आली आहे.सदर घटनेने रोज लोकल रेल्वे प्रवास करणारे प्रवाशी घाबरून गेले आहेत
.प्रा.अलोक सिंग हे अतिशय शांत सुस्वभावाचे होते.भांडणकरणे हा त्यांचा स्वभाव नव्हता.एक सालस माणूस म्हणून ते सहकाऱ्यांमध्ये परिचित होते दोन वर्षापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते.आज पत्नीचा वाढदिवस होता म्हणून ते लवकर धरी चालले होते. मालाड स्टेशनवर उतरण्यापूर्वी त्यांचाओंकार शिंदे सोबत किरकोळ कारणामुळे वाद झाला होता, त्याचा राग मनात धरुन आरोपी ओंकार शिंदे याने त्यांचा पोटात धारदार शस्त्राने वार केला.त्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने  डॉक्टरांनी त्यांना  मृत घोषित करण्यात आले.
हे का झाले.?
हे का झाले? याचा विचार केला तर केवळ परकोटीच्या भयंकर क्रोधामुळेअसे लक्षात येते. ओंकार शिंदे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी काही आहे का? ते पोलीस तपासात निष्पन्न होईलच पण या घटनेतून प्रवासी म्हणून प्रवास करताना स्वतःची काळजी कशी घेता येईल याकडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे.
 सारे घडीचे प्रवासी                                                                                                     मुंबईमध्ये लाखों लोक नोकरीनिमित्ताने रोज प्रवास करतात. यात नोकरी करणाऱ्या महिला,पुरुष प्रवाशांची संख्या आहे.नोकरदाराचे निम्मं आयुष्य लोकल प्रवासातच जातं .याप्रवासात दर दिवशी काहीना  काही कारणाने वादाचे प्रसंग प्रत्येकाच्या वाट्याला येत असतात. कधी लोकलमध्ये चढण्यावरून, तर कधी बसण्याच्या जागेवरून,तर कधी चढण्याच्या गडबडीत लागलेल्या धक्क्या वरून कायम भांडणे होतं असतात.धाराधारी,मारामारी पर्यन्त अनेक घटना घडत असतात.
खरंतर हा प्रवास तीन चार तासांचा असतो पण रोजचा असतो.कामाला जाण्याची घाई सगळ्यांनाच असते.सगळे रोजचे प्रवाची असतात.काही एकमेकांच्या ओळखीचेही असतात.त्यांचे छान ग्रुपही असतात.

बसण्याची जागा,जोराचा धक्का आणि बरंच काही                                                                         कधीकधी या ग्रुपचे अलिखित वर्चस्व त्या लोकलमध्ये निर्माण झालेले असते. ते पक्षाप्रमाणे अनोळखी व्यक्तीला आपल्या कळपात घेत नाहीत.तो व्यक्ती ताकदीने अथवा कायद्याने भांडणारी असेल तर वाद भांडणे जोरात होतात, या भांडणात दुसऱ्या कळपातली माणसेही सहभागी होतात. .त्यात बाकीचे प्रवासीही जात,भाषा,पक्ष,प्रांत गाव,ग्रुप यानुसार सहभागी होतात आणि वाद उत्तरोत्तर वाढत जातो,मारामारी होते आणि त्यात एखादा गंभीर जखमी होतो किंवा एखाद्याचा मृत्यूही होतो.हे सारं होतं ते केवळ अतिरागामुळे. त्यातही या प्रवासात काही काही अशी माणसं भेटतात की विकृत, विक्षिप्त,व्यसनी, मग्रूर अशी असतात.त्यांना भांडणासाठी कारणच लागतं, ते मिळाले की मग शब्दाने शब्द वाढत जातो. शाब्दिक वाद मारामारी पर्यन्त जातो तीवेळ येऊ नये म्हणून
आपण एवढेच करु शकतो.
अशावेळी प्रत्येकाने अशा गोष्टीकडे सोईस्कर दुर्लक्ष करावे कितीही राग आला तरी आपल्या रागावर ताबा ठेवावा.आपल्या परिवारातील लोकांचा विचार करावा,आई-वडील,बायको-मुले यांचे चेहरे डोळ्यासमोर आणावे आणि वाद टाळावा.नकोतिथं ताकद दाखवण्यापेक्षा माघार घेणे कधीही चांगले. तरीही वाद झालाच तर सहप्रवाशांनी तो समोपचाराने मिटवावा.समोरची व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याचे जाणवतेच अशावेळी पोलिसांना कळवावे. व्यक्ती आणि सामूहिक प्रयत्नांनातूनच असे प्रसंग टाळता येऊ शकतात एवढेच आपल्या हातात आहे आणि ते आपण निश्चित करू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

error: Content is protected !!