Homeमहाराष्ट्रMumbai, Municipal Elections : “मनसेचा पहिला उमेदवार जाहीर; राज ठाकरेंनी एबी फॉर्म...

Mumbai, Municipal Elections : “मनसेचा पहिला उमेदवार जाहीर; राज ठाकरेंनी एबी फॉर्म दिला, यशवंत किल्लेदार उमेदवार”

Times of Maharashtra Desk: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उमेदवारांची तयारी जोरात सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांना पहिला एबी फॉर्म देण्यात आला. स्वतः राज ठाकरेंनी हा फॉर्म यशवंत किल्लेदार यांना दिला. या सोहळ्यास मनसेचे इतर नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर उपस्थित होते.

यशवंत किल्लेदार हे वॉर्ड क्रमांक 192 मधून उमेदवारी दाखल करणार आहेत. एबी फॉर्म मिळाल्यानंतर यशवंत किल्लेदार भावूक झाले आणि म्हणाले, “माझ्यासाठी ही भावनिक आणि आनंदाची गोष्ट आहे. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही पोचपावती मिळाली. कंठ दाटून आला आहे.”

ठाकरे गटाची नाराजी .. 

दरम्यान, मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीत वॉर्ड क्रमांक 192 ची जागा मनसेला मिळाल्याने ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार प्रकाश पाटणकर नाराज झाले आहेत. त्यामुळे यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी मिळाल्यानंतर प्रकाश पाटणकर शिवसेना शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. यामुळे मनसे-ठाकरे गटाच्या युतीमध्ये बंडखोरीचा धोका निर्माण होऊ शकतो.

मुंबई महापालिकेत एकूण 227 जागांसाठी निवडणूक पार पडणार असून, बहुमत मिळवण्यासाठी 114 जागा आवश्यक आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी 24 डिसेंबर 2025 रोजी ऐतिहासिक युतीची घोषणा केली होती. त्यामुळे मुंबईच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे.

भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या महायुती विरुद्ध ठाकरे बंधूंच्या युतीत थेट सामना रंगणार असून, कोणाला बहुमत मिळेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांमध्ये मतदान 15 जानेवारी 2026 रोजी होणार असून, मतमोजणी 16 जानेवारी 2026 रोजी होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

error: Content is protected !!