Homeताज्या बातम्याNashik Municipal Election 2026 : नाशिक महापालिका निवडणूक 2026: भाजप तिकीट वाटपाचा...

Nashik Municipal Election 2026 : नाशिक महापालिका निवडणूक 2026: भाजप तिकीट वाटपाचा थरार रस्त्यावर, एबी फॉर्मसाठी गाड्यांचा पाठलाग

Times of Maharashtra Desk: नाशिक महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून, त्यातच भाजपच्या तिकीट वाटपावरून नाशिकमध्ये मोठा राजकीय थरार पाहायला मिळत आहे. भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू असतानाच, एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा थेट रस्त्यावर पाठलाग झाल्याची घटना समोर आली आहे.

नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या गाडीचा काही इच्छुक उमेदवारांनी पाठलाग केल्याची माहिती आहे. या ताफ्यात आमदार राहुल ढिकले आणि आमदार सीमा हिरे यांचाही समावेश असल्याचे समजते. पंचवटी आणि नवीन सिडको परिसरातील इच्छुक उमेदवार आपल्याला उमेदवारी मिळावी, या मागणीसाठी एबी फॉर्म घेऊन जाणाऱ्या वाहनांचा पाठलाग करत असल्याने नाशिक-मुंबई महामार्गावर सुमारे अर्धा ते एक तास राजकीय गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्ते तिकिटांची मागणी करत होते. मात्र, ऐनवेळी काही नवीन चेहऱ्यांना तिकीट दिले जात असल्याने पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. या प्रकारामुळे भाजपच्या तिकीट वाटपातील गोंधळ उघड झाला असून, नाशिकमधील महापालिका निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

दरम्यान, भाजपकडून आणखी एक वादग्रस्त निर्णय समोर आला आहे. धोत्रे खून प्रकरणातील आरोपी आणि सध्या कारागृहात असलेले भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचे पुत्र रिद्धीश निमसे यांना भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. संबंधित प्रभागातील राजकीय समीकरणे आणि पक्षीय ताकद लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रिद्धीश निमसे यांनी माध्यमांशी बोलताना, “विकासाच्या मुद्द्यावर जनता आमच्यासोबत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आम्हाला निश्चितच विजय मिळेल,” असा विश्वास व्यक्त केला. तिकीट वाटपावरून सुरू असलेल्या या घडामोडींमुळे नाशिक महापालिका निवडणूक 2026 अधिकच रंगतदार ठरत असल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!