Homeताज्या बातम्याPune Municipal Elections : पुण्यात महायुतीतून गैरसमज; भाजप-शिवसेना युती तुटली नसल्याचे स्पष्ट

Pune Municipal Elections : पुण्यात महायुतीतून गैरसमज; भाजप-शिवसेना युती तुटली नसल्याचे स्पष्ट

Times of Maharashtra Desk: पुण्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. निवडणुका जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भाजप आणि शिवसेनेची युती जाहीर होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आतापर्यंत झालेल्या बैठका, चर्चा आणि जागावाटपामध्ये अपेक्षित तोडगा निघाल्यामुळे काही गैरसमज निर्माण झाले होते.

शिवसेनेचे पुण्याचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी सकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “पक्षातील ७० ते ८० जणांनी आज फॉर्म भरले आहेत. त्यांना एबी फॉर्म दिले जाणार आहेत. उर्वरीत ठिकाणी देखील आज फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.” या घोषणेनंतर पुण्यात भाजप-शिवसेना युती तुटली आहे अशी चर्चा सुरू झाली होती.

परंतु, शिवसेना नेते व मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात येताच माध्यमांशी संवाद साधून स्पष्ट केले की, पुण्यात महायुती तुटलेली नाही. त्यांनी सांगितले,
“कोणत्याही महानगरपालिकेत महायुती तुटली आहे असे चित्र नाही. पुण्यात भाजपने नक्कीच एबी फॉर्म दिलेले आहेत, तसेच शिवसेनेच्या नेत्यांनीही विचार करून फॉर्म दिले आहेत. अर्ज माघारी घेण्याची तारीख आणि अर्ज छाननीची तारीख येण्यासाठी अजून दोन-तीन दिवस आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गैरसमज करून घेऊ नये.”

उदय सामंत यांनी पुढे सांगितले की, वाटपामध्ये थोडेफार तिकडे-इकडे होत आहे. पण शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. “शिवसेना जिथे जिंकू शकते अशा ठिकाणी आम्ही एबी फॉर्म दिले आहेत. सर्व बाबींवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

उदय सामंत यांनी छत्रपती संभाजीनगरचा मुद्दाही नमूद करत सांगितले की, पुण्यासारखेच तेथेही काही मुद्दे उरले आहेत, पण पुढील दोन दिवसांत ते दूर केले जातील. यंदा ही २९ महानगरपालिकांमध्ये निवडणुकीचे पहिले वर्ष असल्याने नेत्यांना बोलायला वेळ कमी मिळाला होता, त्यामुळे कार्यकर्त्यांनी गैरसमज करू नये, असेही त्यांनी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!