Homeताज्या बातम्याप्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचा विसर: नाशिकमध्ये राजकीय वाद पेटला, प्रकाश आंबेडकर आक्रमक

प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचा विसर: नाशिकमध्ये राजकीय वाद पेटला, प्रकाश आंबेडकर आक्रमक

Times Of Maharashtra Desk : नाशिकमध्ये ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या शासकीय ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न केल्यामुळे मोठा वाद उभा राहिला आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून मानले जाणारे बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात आदराने घेतले जाणे अपेक्षित असते, पण महाजन यांच्या भाषणात त्यांच्या नावाचा उल्लेखच नव्हता. यावरून समाजातील अनेकांचे संताप व्यक्त झाला असून, विशेषतः वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री महाजन यांच्या कृत्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी माधवी जाधव या वनरक्षक महिला अधिकाऱ्याशी फोनवरून संवाद साधून या प्रकरणाची सखोल माहिती घेतली. माधवी जाधव यांनी त्यांनी अनुभवलेल्या घटनेचा तपशील सांगितला. आंबेडकर यांनी या कृत्याला अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा मानून पोलिसांत तक्रार नोंदवण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, तर ते स्वतः कायदेशीर तक्रार दाखल करण्यास मागेपुढे राहणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच, आंबेडकर यांनी भाजप आणि आरएसएसवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सातत्याने अवमान केल्याचा आरोप केला आहे.

माधवी जाधव म्हणाल्या, गिरीश महाजन यांनी भाषणात बाबासाहेबांचे नाव का घेतले नाही, हे त्यांच्या नीच मानसिकतेचे द्योतक आहे. संविधान आणि प्रजासत्ताक दिन यांचे रक्षण करणाऱ्या बाबासाहेबांना संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. मी माझ्या ओळखीला कधीच मातीला देणार नाही.

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील आपला संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, “प्रजासत्ताक दिनी बाबासाहेबांचा उल्लेख न होणे ही मोठी चूक आणि दुर्दैव आहे. बाबासाहेबांचे योगदान भारतीय संविधानासाठी अमूल्य असून ते कुठल्याही मंत्र्याच्या भाषणातून मिटवता येणार नाही.

दरम्यान, गिरीश महाजन यांनी या प्रकरणाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे आणि भविष्यात अशा चुका होणार नाहीत याची दक्षता घेण्याचा आश्वासण दिला आहे.

या वादामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण तापले असून, सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांचे नेते सावधगिरीने भूमिका मांडत आहेत. पण बाबासाहेबांच्या नावाचा आदर राखणे हे समाजासाठी अत्यंत आवश्यक असल्याने या प्रकरणावर पुढील कायदेशीर आणि राजकीय पावले महत्त्वाची ठरणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

error: Content is protected !!