परभणी:(प्रतिनिधी अनिल शेटे) बलात्कार करून जाळून मारल्याने तीन आरोपीना विविध कलमान्वे जन्मठेपेची शिक्षा व २५ हजाराचा दंड ठोठावण्यात आला.ही शिक्षा गंगाखेड येथील अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्हि.एम.सुदाळे यानी दि.२१ जुलै रोजी सदरील शिक्षा सुनावली.
गंगाखेड शिवारातील मरगवाडी परीसरात असलेल्या विटभट्टीवर कामगार असलेल्या एका महिलेवर बलात्कार केला त्यांनंतर विटभट्टीवर असलेल्या एक महिला आणि पुरूषाने जाळून मारले.यात बलात्कार करणारा आरोपी आणि जाळून मारणारे दोन आरोपी अशा तिघांना जन्मठेपीची शिक्षा सुनावण्यात आली.सदरील घटना मार्च २०१३ या महिन्यात घडली होती.
पिडित महिलेला बलात्कार करून जाळण्यात आले त्यानंतर जळालेल्या पिडित महिलेने तिच्यावर घडलेल्या प्रसंगाथा मृत्यू पुर्व जवाब दिला हा जवाब कार्यकारी दंडअधिकारी (नायब तहसिलदार)यांनी नोदवला सदर प्रकरणात गंगाखेड पोलिसांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर हे प्रकरण सुनावनी साठी न्यायालयाच्या बोर्डावर आले यात सरकारी पक्षाच्या वतीने एकुन दहा साक्षिदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या यात तत्कालीन वैद्यकिय अधिकारी तसेच घटनास्थळ पंचाच्या साक्षी मोहत्वपुर्ण ठरल्या मात्र या प्रकरणामध्ये तपासिक अमलदार हे मयत झालेले आसल्यामुळे त्यांची साक्ष तपासण्यात आली नव्हती या खटल्यात आरोपी पक्षाचे वकील व सरकारी पक्षाचे अभियोक्ता यांनी न्यायालयामध्ये युक्तीवाद केला वैद्यकिय अधिकारी यांची साक्ष सरकारी पक्षाचे दहा साक्षिदार पिडितेचा मृत्यू पुर्वीचा जवाब न्यायालयात मोहत्वपुर्ण ठरला तसेच सरकारी पक्षाच्या वतीने माडण्यात आलेली बाजु सक्षम ठरली सरकारी पक्षाच्या सर्व बाजु न्यायालयाने गृह्य धरल्या यात आरोपी बाबासाहेब राणबा सोडगीर राहणार खळी यास बलात्काराच्या कलमाखाली १०वर्षीचा सश्रम कारावास व दहा हजार रूपये दंड तसेच खुन केल्याप्रकरणी जन्मठेप व २५हजार रूपये दंड तसेच आरोपी रंजना लक्ष्मण सरोदे राहणार गौतमनगर गंगाखेड व आरोपी हरिभाऊ ज्ञानोबा मुसळे राहणार अनंददनगर गंगाखेड यांनी पिडित महिलेचा खुन केला म्हणून जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच २५हजाराचा दंड ठोठावण्यात आला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायधिश व्हि एम सुंदाळे यांनी बलात्कार व खुप प्रकरणात आरोपी बाबासाहेब रानबा सोडगिर, रंजना लक्ष्मण सरवदे,हरीभाऊ ज्ञानोबा मुसळे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली व २५हजाराचा दंड ठोठावला या प्रकरणात जिल्हा सरकारी अभियोक्ता डि यु दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा साह्यक सरकारी अभीयोक्ता एस बी पौळ यांनी बाजु मांडली त्यांना साह्यक सरकारी अभियोक्ता एस डी वाकोडकर यांनी सहकार्य केले गंगाखेड पोलिस स्टेशनचे कोर्ट पैरवीकार एच एच जिंगलवाड जे एच पठाण आणी कोर्ट पैरवीकार एम बी कुंडगीर श्रीमती एल व्ही मुंडे यांचे सहकार्य मिळाले






















