Homeमहाराष्ट्रआंबेडकर जयंतीनिमित्त विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

आंबेडकर जयंतीनिमित्त विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) :  लोणेरे विद्यापीठात फुले-शाहू-आंबेडकर सप्ताहाचे भव्य आयोजन; अभ्यास, व्याख्यान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

लोणेरे : डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे दि. 11 एप्रिल ते 16 एप्रिल 2026 या कालावधीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त “फुले-शाहू-आंबेडकर सप्ताह” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात प्रबोधनात्मक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची आकर्षक मेजवानी असणार आहे.

सप्ताहाची सुरुवात दि. 11 एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या 200 व्या द्विशताब्दी वर्षानिमित्त “18 तास अभ्यास” या अनोख्या उपक्रमाने होणार आहे. या उपक्रमात सुमारे 300 विद्यार्थी सलग 18 तास अभ्यास करून बाबासाहेब व त्यांचे गुरु महात्मा फुले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. याच दिवशी सकाळी 11 वाजता प्रा. राजेंद्र कुंभार यांचे महात्मा फुले यांच्या जीवन व कार्यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

दि. 14 एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त “बाबासाहेब सन्मान रॅली” काढण्यात येणार असून, मा. कुलगुरू यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या जीवनावरील प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन 18 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांसाठी खुले राहणार आहे.

दि. 15 एप्रिल रोजी प्रख्यात विचारवंत व लेखक प्रा. प्रदीप आगलावे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून, त्यानंतर मुंबईतील सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा ‘सुपर शो’ तर्फे भीमगीतांचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

सप्ताहाची सांगता सुप्रसिद्ध विचारवंत मा. राजेंद्र रगडे यांच्या ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे.

या सर्व कार्यक्रमांचे आयोजन मा. कुलगुरू मा. राजनीश कामत, कुलसचिव डॉ. अमित शेष, अधिष्ठाता विद्यार्थी कल्याण डॉ. विकास सरगडे तसेच अधिष्ठाता डॉ. सचिन पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. अशोक पवार व कार्याध्यक्ष डॉ. गणेश वरखडे यांच्या नेतृत्वाखाली हे कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती उत्सव समितीच्या सचिव प्रा. सुवर्णा धोंगडे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!