Homeमहाराष्ट्रPMC Ward No.1: कळस-धानोरी-लोहगावमध्ये एकच खुली जागा; इच्छुकांची मोठी रांग

PMC Ward No.1: कळस-धानोरी-लोहगावमध्ये एकच खुली जागा; इच्छुकांची मोठी रांग

Times of Maharashtra Desk, Pune: पुणे महानगरपालिकेच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीसाठी कळस-धानोरी-लोहगाव या प्रभाग क्र. १ मध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. सुमारे १२ ते १५ किलोमीटर परिसरात पसरलेल्या आणि ९२,६४४ लोकसंख्या असलेल्या या प्रभागात धानोरीची लोकसंख्या सर्वाधिक सुमारे ४२ हजार असल्याने तिकीट वाटपात या भागाचा वरचष्मा राहणार आहे. या प्रभागाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास वर्ग अशी तीन आरक्षणे असल्याने सर्वसाधारण प्रवर्गासाठी केवळ एकच जागा उपलब्ध आहे. त्यामुळे या एकमेव खुल्या जागेसाठी महायुतीमधील घटकपक्षांमध्येच मोठी स्पर्धा असून इच्छुकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

प्रभागातील प्रमुख नागरी समस्या

कळस-धानोरी-लोहगाव हा भाग सध्या नागरी सुविधांच्या अभावामुळे आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या तीव्र राजकारणामुळे चर्चेत आहे. १२ ते १५ किलोमीटरच्या विस्तृत परिसरात पसरलेल्या या प्रभागातील कळस, धानोरी, लोहगाव आणि विश्रांतवाडी भागातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत. खराब रस्ते, दोन दिवसांआड होणारा अनियमित पाणीपुरवठा, आणि कचऱ्याचे ढिग यामुळे नागरिक त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, २००८ सालच्या विकास योजनांमधील रस्ते १५ वर्षांनंतरही अपूर्ण आहेत आणि अंतर्गत रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

या प्रभागात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच प्रमुख लढत होणार असली तरी, राष्ट्रवादीतील फुटीमुळे ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी नगरसेवक अनिल टिंगरे हे हॅट्ट्रिकच्या तयारीत असून, खुल्या जागेसाठी त्यांना प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांना स्वपक्षातून स्पर्धा नसली तरी त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे शशिकांत टिंगरे यांनी शड्डू ठोकला आहे. तसेच राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक सतीश म्हस्के, लोहगावचे माजी उपसरपंच नवनाथ मोझे आणि डॉ. राजेश साठे हेसुद्धा मैदानात आहेत. दुसरीकडे, महिला मागासवर्ग गटातून हॅट्ट्रिक साधलेल्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवितात आणि वारंवार केलेल्या पक्षांतराचा त्यांना फटका बसतो का? हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आरक्षित जागांवरही रस्सीखेच

दुसऱ्याबाजुला आरक्षित जागांवरही जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महिला आरक्षित जागेसाठी भाजपकडून वंदना संतोष खांदवे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर पूजा जाधव, मोनिका परांडे यांनीही भाजपच्या तिकिटासाठी जोरदार दावा केला आहे. राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक सतीश म्हस्के यांच्या पत्नी मीनाक्षी म्हस्के या उमेदवार असू शकतात. अनुसूचित जमाती आरक्षित जागेसाठी भाजपचे माजी नगरसेवक नाना सांगडे आणि राष्ट्रवादीकडून संदीप दांगट व संगीता दांगट इच्छुक आहेत. या निवडणुकीत भाजप किंवा राष्ट्रवादीकडून तिकीट न मिळाल्यास अनेक प्रमुख इच्छुक राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

विधानसभेनंतर वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार जगदीश मुळीक आणि सुनील टिंगरे हे दिग्गज नेते प्रथमच समोरासमोर येणार असल्याने आगामी महापालिका निवडणुकीमध्ये चांगलीच राजकीय जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महरखेड शिवारात चक्रीवादळ व मुसळधार पावसाचा तडाखा लाखो रुपयाचे नुस्कान.

0
देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे) : दिनांक 12 जून 2026 रोजी सायंकाळी ६.३० वाजता आलेल्या अचानक चक्रीवादळामुळे लाखो रुपयांचे नुकसान सिंदखेडराजा तालुक्यातील महारखेड शिवारामध्ये...

सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरातील गैरप्रकारांविरोधात नागरिकांचे पोलीस प्रशासनाकडे निवेदन

0
दौंड (प्रतिनिधी संघराज गायकवाड): दौंड शहरातील सरपंच वस्ती–गोपाळवाडी रोड परिसरात महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत तसेच अवैध मटका, ऑनलाईन जुगार आणि...

सासरच्या छळाला वैतागून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा

0
कन्नड (प्रतिनिधी संतोष खाजेकर): कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माहेरी आलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने सासरच्या कथित छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...

लालफीतशाहीला फाटा; बीडचे तहसीलदार ठरताहेत गोरगरिबांचे ‘देवदूत’

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड:) महसूल प्रशासनातील लालफीतशाहीला फाटा देत, बीड तालुक्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी आपल्या लोकाभिमुख आणि गतिमान कार्यपद्धतीने नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक...

नाशिक शहरात 27 जूनपर्यंत शस्त्र व जमावबंदी लागू: पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचे आदेश

0
नाशिक (योगेश कर्डीले नाशिक उत्तम जाधव निफाड): कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक...

error: Content is protected !!