Homeताज्या बातम्याPune: कल्याणी नगरमध्ये नागरिकांचे तीव्र आंदोलन; डोळ्यावर पट्टी बांधून केला निषेध; पब्स-बार्सच्या...

Pune: कल्याणी नगरमध्ये नागरिकांचे तीव्र आंदोलन; डोळ्यावर पट्टी बांधून केला निषेध; पब्स-बार्सच्या नियमभंगावरून पालिका आणि दारू परवाना विभागावर प्रश्नचिन्ह

Times of Maharashtra Desk, Pune: कल्याणी नगर परिसरात पब्स, बार्स आणि रूफटॉप्सकडून अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या नियमभंगावर कठोर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ वडगावशेरी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने परिसरातील नागरिकांनी आज गोल्ड अडलेब चौक, कल्याणी नगर येथे तीव्र आंदोलन केले.
वडगावशेरी ब्लॉक काँग्रेसचे उपाध्यक्ष सचिन भोसले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत पुणे महानगरपालिका आणि दारू परवाना विभागाला थेट आणि कठोर प्रश्नांची सरबत्ती केली.

डोळ्यावर पट्टी बांधून निषेध

आंदोलनादरम्यान नागरिकांनी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून एक प्रतीकात्मक निषेध केला. या कृतीतून नागरिकांच्या समस्यांकडे प्रशासनाने जाणूनबुजून दुर्लक्ष केले असल्याचे तीव्र भाष्य करण्यात आले. विशेषतः, पोर्शे अपघात प्रकरणानंतर प्रशासनाने नियमन आणि कारवाईची जी आश्वासने दिली होती, ती आजही अंमलात न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र रोष दिसून आला.

नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्न

कल्याणी नगरसारख्या निवासी भागात मद्यविक्रीचे परवाने नेमके कोणत्या आधारावर दिले गेले?
बेकायदेशीर पब्स व रूफटॉप्सना त्यांचा विस्तार करण्याची आणि मुक्तपणे चालू राहण्याची मुभा का देण्यात आली?
परवान्याच्या वेळेपलीकडे आणि परवाना क्षेत्राबाहेर मद्यविक्री कशी आणि कोणाच्या दुर्लक्षाने चालू राहिली?
नागरिकांच्या वारंवार दाखल झालेल्या तक्रारींकडे जाणूनबुजून दुर्लक्ष कोणी केले?
पोर्शे प्रकरणानंतर दिलेली आश्वासने आजपर्यंत प्रत्यक्षात का उतरली नाहीत?
परवान्याच्या अटींची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार?
आणखी किती गंभीर घटना घडल्यावर प्रशासनाला कारवाई करावीशी वाटेल?

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

error: Content is protected !!