Homeक्राईमPune Crime : महिलेवर अनैसर्गिक अत्याचार, हवालदार पतीसह इतर तिघांवर गुन्हा दाखल...

Pune Crime : महिलेवर अनैसर्गिक अत्याचार, हवालदार पतीसह इतर तिघांवर गुन्हा दाखल…

Times of Maharashtra Desk, Pune : कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदारावर त्याच्या पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार व छळ केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित महिला पेशाने शिक्षिका आहे. तिने हे गंभीर आरोप केले आहेत. पीडित पत्नीच्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपी हवालदार, तिची सासू, दीर आणि जाऊ अशा सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा धक्कादायक प्रकार २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या कालावधीत हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथे घडत होता. पीडितेच्या म्हणण्यानुसार, १२ वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर आरोपी पतीने तिच्यावर अनेकवेळा, तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने अनैसर्गिक अत्याचार केले, तसेच घरगुती वादातून सासरच्या मंडळींकडून तिला सातत्याने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला गेला. इतकेच नव्हे तर, पीडिता गरोदर असताना पतीसह सासरच्या लोकांनी संगनमत करून तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचा गंभीर आरोपही फिर्यादीत नमूद आहे. हवालदार पतीने “तु माझं घर सोड, नाहीतर तुला आणि मुलाला संपवीन” अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी या गंभीर प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८(अ), ३००, ३१३, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

डॉक्टरांना शनिवार-रविवार सुट्टी देऊन रुग्णांना मरणाच्या दारात सोडणारे शासनाचे धोरण कशासाठी? ब्रह्मपुरीत नागरिकांचा संताप

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सण-उत्सव, शनिवार किंवा रविवार असो कोणताही विचार न करता २४ तास ऑन ड्युटी तैनात असते....

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) वर्धापन दिन व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचा...

0
दौंड:(प्रतिनिधी संघराज गायकवाड, मयुर साळवे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षाचा 36 वा वर्धापन दिन तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन नायक दीपक भाऊ निकाळजे...

पूरग्रस्त गोदाकाठचे पंचनामे करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

0
 निफाड:(प्रतिनिधी उत्तम जाधव)   गोदाकाठमध्ये पुरामुळे सर्वच शेतकरी व सायखेडा, चांदोरीतील दुकानदारांचे तसेच रहिवासी यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने पंचनामे...

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

error: Content is protected !!