Homeक्राईमPune Crime : पुणे हादरले: पत्नीचा खून करून मृतदेह भट्टीमध्ये जाळला!

Pune Crime : पुणे हादरले: पत्नीचा खून करून मृतदेह भट्टीमध्ये जाळला!

Times of Maharashtra Desk, Pune : पुणे शहरात वारजे परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि क्रूर घटना समोर आली आहे, पतीने आपल्या पत्नीची हत्या करून तिचे अवशेष नष्ट करण्यासाठी मृतदेह चक्क एका लोखंडी भट्टीमध्ये जाळल्याचे उघड झाले आहे.पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीला अटक केली असून त्याचे नाव समीर जाधव असे आहे. खून झालेल्या पत्नीचे नाव अंजली जाधव असल्याची माहिती आहे.

नेमकी घटना काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कलह सुरू होता. याच वादातून आरोपी समीर जाधव याने आपली पत्नी अंजली हिचा निर्घृण खून केला. खुनानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपी समीर याने अंजलीचा मृतदेह एका लोखंडी भट्टीमध्ये टाकला आणि जाळला. नंतर तो स्वत:च वारजे पोलिसांकडे पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी गेला. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी वेगाने तपास केल्यानंतर त्यांना समीर जाधवचा संशय आल्याने त्यांनी त्याची चौकशी केली. चौकशीमध्ये त्यानेच पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपी पती समीर जाधव याला अटक केली आहे.

या भयंकर घटनेने वारजे परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या या क्रूर हत्येने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेहाचे अवशेष ताब्यात घेतले आहेत. घटनेचा अधिक तपास सुरू असून, आरोपीने हा गुन्हा कोणत्या कारणास्तव केला आणि त्याला आणखी कोणी मदत केली का, याचा पोलीस शोध घेत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!