Homeताज्या बातम्यापुणे विकास की कोट्यवधींचा खेळ? २०० मीटर रस्त्याने उघडले प्रशासनाचे भयावह गणित;...

पुणे विकास की कोट्यवधींचा खेळ? २०० मीटर रस्त्याने उघडले प्रशासनाचे भयावह गणित; भवानी पेठेतील फक्त २०० मीटर रस्त्यासाठी साडेसहा कोटी! मग संपूर्ण पुण्यासाठी किती हजार कोटी?

Times of Maharashtra Desk, Pune: पुणे शहरातील विकासकामांचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून, केवळ सुमारे २०० मीटर लांबीच्या एका रस्त्यासाठी तब्बल साडेसहा कोटी रुपयांहून अधिक रक्कम मंजूर करण्यात आल्याने संपूर्ण शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. जुना मोटर स्टँड चौक ते अलंकार मेडिकल दरम्यानच्या या अल्प अंतराच्या रस्त्याच्या कामासाठी इतका प्रचंड खर्च कसा काय ठरवण्यात आला, असा थेट सवाल पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला विचारला जात आहे.

या प्रकरणात केवळ खर्च जास्त आहे एवढाच मुद्दा नसून, त्यातून उघड होणारे भयावह गणित अधिक अस्वस्थ करणारे आहे. जर २०० मीटर म्हणजे केवळ ०.२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी साडेसहा कोटी रुपये खर्च होत असतील, तर साध्या गणितानुसार एका किलोमीटर रस्त्यासाठी सुमारे ३२ ते ३३ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला जातो. याच हिशोबाने जर शहरभर रस्ते बांधण्याचा विचार केला, तर पुणे महानगरपालिकेचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ५१८ चौरस किलोमीटर असल्याने, किमान प्रत्येक चौरस किलोमीटरमध्ये एक किलोमीटर रस्ता गृहित धरला तरी हा खर्च थेट १६ हजार कोटी रुपयांच्या पुढे जातो. हा आकडा पाहता पुणे शहराचा विकास आराखडा आहे की कोट्यवधींचा आर्थिक प्रयोगशाळा, असा प्रश्न उपस्थित होतो.

हे गणित केवळ रस्त्यांपुरतेच मर्यादित आहे. याच रस्त्यांखाली टाकण्यात येणाऱ्या नळवाहिन्या, गटारे, ड्रेनेज लाईन, केबल डक्ट, चेंबर्स, पावसाळी पाणी वाहून नेण्याच्या यंत्रणा आणि इतर नागरी कामांचा खर्च वेगळा धरला, तर पुणेकरांच्या कराचा पैसा नेमका किती हजार कोटींमध्ये वाहून जातो आहे, याचा विचारही अंगावर काटा आणणारा आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे कंत्राट एका माजी नगरसेवकाच्या सांगण्यावरून काढण्यात आल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे. एवढेच नव्हे तर सदर कामाचे कंत्राट त्या माजी नगरसेवकांच्या जवळीक असलेल्या व्यक्तीलाच देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया पारदर्शक होती का, दरनिश्चिती करताना बाजारभाव, तुलनात्मक कामे आणि तांत्रिक गरजांचा अभ्यास केला गेला का, की सगळा कारभार ठराविक व्यक्तींच्या फायद्यासाठी राबवण्यात आला, असा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे.

२०० मीटर रस्त्यासाठी साडेसहा कोटींचा खर्च ठरवताना कोणत्या तांत्रिक बाबींचा आधार घेण्यात आला, कोणत्या दर्जाच्या साहित्याचा वापर प्रस्तावित आहे, आणि याच प्रकारचे काम शहरातील इतर भागात किती दरात झाले आहे, याबाबत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि मुख्य अभियंता यांनी अद्याप कोणतेही ठोस स्पष्टीकरण दिलेले नाही. एवढ्या मोठ्या रकमेच्या कामावर जर प्रशासकीय पातळीवरून प्रश्नच विचारले जात नसतील, तर ही बाब केवळ आर्थिक गैरव्यवहाराची नसून थेट कर्तव्यच्युतीची ठरते.

पुणे शहरातील नागरिक रोज खड्डे, धूळ, अपघात आणि वाहतूक कोंडी सहन करत असताना, दुसरीकडे २०० मीटर रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये मंजूर होत असतील आणि त्याचे गणित हजारो कोटींमध्ये जात असेल, तर हा विकास नसून पुणेकरांच्या खिशावर घातलेला अधिकृत दरोडा असल्याची भावना बळावत आहे. आता तरी या प्रकरणाकडे डोळे उघडून पाहण्याची वेळ पुणे महानगरपालिकेच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांवर आली असून, अन्यथा हा मुद्दा लवकरच केवळ पत्रकारितेपुरता मर्यादित न राहता कायदेशीर आणि जनआंदोलनाचा विषय बनेल, हे स्पष्ट दिसत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!