Homeटेक्नॉलॉजीSPPU: समान उपकरणे, किंमत मात्र वेगवेळी; पुणे विद्यापीठाच्या टेकनॉलॉजी विभागातील प्रकार; कोट्यावधी...

SPPU: समान उपकरणे, किंमत मात्र वेगवेळी; पुणे विद्यापीठाच्या टेकनॉलॉजी विभागातील प्रकार; कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप…

Times of Maharashtra Desk, Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा तंत्रज्ञान विभाग राज्य सरकारने निधी दिलेल्या प्रकल्पांसाठी उपकरणे खरेदी करताना किमान 3.5 कोटी जास्त खर्च करून अनियमितता केल्याच्या आरोपांमुळे सध्या चौकशीच्या घेऱ्यात आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते व सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे हे गंभीर आरोप केले आहेत. २०१८-१९ मध्ये रुसा व्हर्च्युअल क्लासरूम प्रकल्प RUSA आणि महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाने दिलेला निधी दुसऱ्या प्रकल्पासाठी व उपकरणे खरेदी करताना किमतीमध्ये मोठी तफावत आढळली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

एका प्रकल्पात १० केव्हीए यूपीएस ३,७८,९००रुपयांना खरेदी केले, तर दुसऱ्या प्रकल्पात समान १० केव्हीए यूपीएस फक्त १५ मिनिटांच्या बॅकअपने ३५,०९,०५० रुपयांना खरेदी केले गेले. ईएसएल एक्सेस कंट्रोल सिस्टीमची किंमत एका प्रकल्पात ४३,४५८ इतकी होती तर तीच सिस्टीम दुसऱ्या प्रकल्पात १०,१६,७२६ रुपयांना खरेदी करण्यात आली. अशाच प्रकारे फायर अलार्म सिस्टीम आणि सीसीटीव्ही सिस्टीमच्या खरेदीतही मोठी दरवाढ दाखवण्यात आली आहे.

वेलणकर यांनी ८ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून EOW फौजदारी चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंनाही तक्रारीची प्रत दिली आहे. या आरोपांनंतर विद्यापीठाच्या प्रशासनाने २०१८ मध्ये झालेल्या या खरेदी प्रकरणांची सखोल पडताळणी सुरू केली आहे. पडताळणीतून जे निष्कर्ष समोर येतील त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

”विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाच्या विभागप्रमुखांनी साहित्य खरेदी मध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला आहे. हे माहीती अधिकारांमधून समोर आले आहे. असे असतानाही विद्यापीठ प्रशासन त्यांच्यावर कारवाई का करत नाही? कुलगुरू आणि इतर अधिकाऱ्यांना देखील यामधून टक्केवारी मिळाली आहे का ? अशी शंका निर्माण होत आहे. हा सर्व पैसा विद्यार्थ्यांचा आहे, कामगारांचा आहे. त्या प्राध्यापकांकडून या सर्व रक्कमेच्या पाच पट रक्कम वसूल करून त्यांची तात्काळ हकालपट्टी झाली पाहिजे. अन्यथा लवकरच आम्ही तीव्र आंदोलन करू.”
– राहुल ससाणे (अध्यक्ष – विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!