Homeताज्या बातम्याआगामी गणेशोत्सव, ईद ए मिलाद या सणांचे पार्श्वभुमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर...

आगामी गणेशोत्सव, ईद ए मिलाद या सणांचे पार्श्वभुमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र यांनी पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस घटकाची कायदा व सुव्यवस्थेची आढावा बैठक घेतली…

आगामी गणेशोत्सव, ईद ए मिलाद या सणांचे पार्श्वभुमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र यांनी पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस घटकाची कायदा व सुव्यवस्थेची आढावा बैठक घेतली…

पुणे :- आगामी गणेशात्सव – २०२४ व ईद ए मिलाद या सणाच्या पार्श्वभुमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पुर्वतयारी करणे करीता विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापुर यांचे अध्यक्षतेखाली पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस घटकाची दिनांक २६/०८/२०२४ रोजी कायदा व सुव्यवस्थेची आढावा बैठक पार पडली आहे.
सदर बैठकीमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र यांनी आगामी श्रीगणेशोत्सव- २०२४ व ईद ए मिलाद हे सण शांततेत पार पडण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस घटकाकडून करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेवून सदर सणांचे निमीत्ताने यापुर्वी गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करून योग्य उपाय योजना करणेबाबत सांगितले. गणेश मंडळांच्या बैठका तसेच ईद ए मिलाद चे अनुषंगाने शांतता कमिटीची बैठक घेवून योग्य त्या सुचना करणेबाबत सांगणेत आले. तसेच दंगा काबु योजना राबविणे, संवेदनशील ठिकाणी रूट मार्च करून जातीय तणाव वाढणार नाही याबाबत दक्षता घेण्याबाबत सुचना केल्या. महिला विषयक गुन्हयांना प्रतिबंध करून शाळा कॉलेजमध्ये जावून मार्गदर्शन करणे, अनुचित घटनांवर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करणे अशा सुचना करणेत आलेल्या आहेत.
तसेच आगामी विधानसभा निवडणुक २०२४ मतदान प्रक्रिया पारदर्शक, भयमुक्त व निष्पक्षपणे पार पाडणे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणे याकरीता मतदान केंद्रांची माहिती घेवून आढावा घेण्यात आला, उपद्रवी लोकांचे हालचालींवर लक्ष ठेवून सोशल मिडीया मॉनिटरींग करून अनुचित संदेश-पोस्ट टाकणारे व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी. योग्य ती खबरदारी व दक्षता घेणेबाबत सुचना दिल्या आहेत.
पुणे ग्रामीण जिल्हयातील गुन्हयांचा आढावा घेवून दरोडयाचे गुन्हयांना आळा बसल्याने पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे कौतुक केले असून इतर गुन्हयांवर नियंत्रण मिळवून जास्तीत जास्त गुन्हयांचा उलगडा करणेबाबत सुचना केल्या आहेत. सदर गणेशोत्सव व ईद ए मिलाद हे सण साजरे होत असताना कायदा व सुव्यस्था अबाधित
राखणे करीता पुणे ग्रामीण पोलीस दल पुर्णतः सज्ज असुन जिल्हा विशेष शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, बिनतारी संदेश विभाग, कल्याण शाखा या शाखेकडून करण्यात आलेल्या नियोजनाचा आराखडा, गुन्हे आढावा, तसेच आगामी विधानसभा निवडणुक २०२४ चे संदर्भात पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र कोल्हापुर यांना अवगत केले. सदर बैठकीस अपर पोलीस अधिक्षक, पुणे विभाग, उप विभागीय पोलीस अधिकारी हवेली उपविभाग, तसेच प्रभारी अधिकारी, जिल्हा विशेष शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, कल्याण शाखा, बिनतारी संदेश विभाग, मोटार परिवहन विभाग, वाहतुक शाखा, कार्यालय अधीक्षक व रापोनि, विविध शाखांचे प्रभारी अधिकारी हजर होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!