Homeताज्या बातम्याPune December 31 Special Traffic Changes: नववर्ष स्वागतासाठी पुण्यात वाहतूक बदल; मद्यधुंद...

Pune December 31 Special Traffic Changes: नववर्ष स्वागतासाठी पुण्यात वाहतूक बदल; मद्यधुंद वाहनचालकांवर कडक कारवाईचा इशारा

Times of Maharashtra Desk: नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर जल्लोष होत असतो. यानिमित्ताने लष्कर, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रस्ता व जंगली महाराज रस्ता परिसरात होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पुणे वाहतूक पोलिसांकडून आज बुधवार, ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजल्यानंतर विशेष वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत.वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येणार असून, रात्री १२ वाजेपर्यंत जड वाहनांना शहरात प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.

फर्ग्युसन रस्ता व जंगली महाराज रस्त्यावरील वाहतूक बदल

1) कोथरूड व कर्वे रस्त्याकडून येणारी वाहतूक खंडुजीबाबा चौक येथे थांबविण्यात येणार असून, ती विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता व अलका चित्रपटगृह मार्गे वळविण्यात येणार आहे.

2) जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी लक्षात घेता झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकातून पुढील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधित वाहतूक गोखले स्मारक चौक, उपरस्ते, पुणे महापालिका भवन, ओंकारेश्वर मंदिर व छत्रपती शिवाजी महाराज मार्गे वळविण्यात येईल.

3) वाय जंक्शनकडून महात्मा गांधी रस्त्याकडे जाणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मशीद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.

4) इस्कॉन मंदिराकडून लष्कर भागातील महात्मा गांधी रस्ता परिसरात सायंकाळी ५ नंतर वाहनांना प्रवेश बंद राहील.

5) फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना प्रवेश बंद ठेवण्यात येणार असून, ही बंदी पहाटे ५ वाजेपर्यंत लागू राहील.

6) बाबासाहेब आंबेडकर रस्ता तसेच अरोरा टॉवर्सकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. व्होल्गा चौकातून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूकही बंद राहील. या मार्गावरील वाहतूक ईस्ट स्ट्रीटमार्गे इंदिरा गांधी चौकाकडे वळविण्यात येईल.

7) इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद राहील. ही वाहतूक लष्कर पोलीस ठाण्याकडे वळविण्यात येणार असून, सरबतवाला चौकातून महावीर चौकाकडे वाहतूक सुरू राहील.

महात्मा गांधी व जंगली महाराज रस्ता राहणार बंद
लष्कर भागातील महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौक ते अरोरा टॉवर्स चौकदरम्यान सायंकाळी ५ नंतर वाहनांना पूर्णतः प्रवेश बंद राहील. तसेच फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत पहाटे ५ वाजेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
पुणेकरांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि सुरक्षित पद्धतीने नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ स्वतंत्र जिल्हा व वरणगाव तालुका निर्मितीची मागणी पुन्हा जोर धरू लागली

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यात नवीन जिल्हे आणि तालुक्यांच्या निर्मितीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असताना, जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ स्वतंत्र जिल्हा तसेच...

तुमच्या भावनेला अनुसरून अधिक संतुलित आणि प्रभावी “विचार सामान्यांचे” स्वरूप असे मांडता येईल

0
(प्रतिनिधी उत्तम जाधव ,योगेश कर्डिले) : तुमच्या मांडणीत अन्नभेसळ, बनावट औषधे आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नांबाबतची नाराजी स्पष्टपणे दिसते. मात्र सार्वजनिकरित्या व्यक्त होताना...

कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्रातील कोळी जमातीतील अनुसूचित जमातीच्या बांधवांना जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी...

कमिशनखोरीच्या दलदलीत विकासकामांचा बळी!

0
चंद्रपूर (स्टेट हेड निलेश ठाकरे) : जनतेच्या पैशावर भ्रष्टाचाराची उघडी लूट 'कंत्राटदारांना आमदार, खासदारांना १० टक्के द्यावे लागत असेल आणि त्यात नगरसेवक, सरपंच, अधिकारी,...

परळी–गंगाखेड बाह्यवळण नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांचे विभागीय प्रबंधक दक्षिण मध्य रेल्वे, नांदेड...

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) वतीने तसेच प्रस्तावित परळी–गंगाखेड नवीन रेल्वेमार्गामुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेबाबत गंभीर हरकती नोंदवण्यात...

error: Content is protected !!