Homeताज्या बातम्याएमपीएल’च्या तिसऱ्या हगामांसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चा ‘कोल्हापूर टस्कर’ संघ सज्ज...

एमपीएल’च्या तिसऱ्या हगामांसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चा ‘कोल्हापूर टस्कर’ संघ सज्ज…

जुन्या खेळाडूंबरोबरच नव्या चेहऱ्यांनाही संघात स्थान’

रजनीश गुरबानी ठरला सर्वांत महागडा खेळाडू

पुणे (टाईम्स ऑफ महाराष्ट्र ब्युरो) – अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या (एमपीएल) तिसऱ्या हगामांसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चा ‘कोल्हापूर टस्कर’ संघ सज्ज झाला आहे. या लीगसाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावामध्ये (ऑक्शन) संघातील जुन्या खेळाडूंबरोबरच नवीन गुणी चेहऱ्यांनाही ‘पुनीत बालन ग्रुप’ने संधी दिली आहे.

‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’ने इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) धर्तीवर ‘महाराष्ट्र प्रीमियर लीग’ (एमपीएल) सुरू केली आहे. २०२३ पासून सुरू झालेल्या या लीगमध्ये पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, संभाजीनगर, नाशिक आणि सोलापूर या सहा संघाचा समावेश आहे. त्यात ‘कोल्हापूर टस्कर’ या पुण्यातील युवा उद्योजक आणि ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांच्याही संघाचा समावेश आहे. दरम्यान लीगच्या तिसऱ्या हगामांसाठी पुण्यात गुरुवारी खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली. त्यात ‘कोल्हापूर टस्कर’ या संघाने जुन्या ११ खेळाडूंना आपल्याकडे कायम ठेवत नव्याने तब्बल १८ खेळाडूंसाठी बोली लावत त्यांचाही आपल्या संघात समावेश केला आहे. त्यामुळे ‘कोल्हापूर टस्कर’ संघाकडे आता तब्बल २९ खेळाडू असणार आहेत आणि हा एमपीएल मधील हा सुपर संघ ठरला आहे. या संघातील रजनीश गुरबानी या खेळाडूंवर सर्वाधिक ५ लाख २० हजारांची बोली लागली होती. त्यामध्ये ‘पुनीत बालन ग्रुप’ने बोलीची सर्वाधिक रक्कम देत या खेळाडूला संघात घेतले.

        👇👇👇 Advertisement 👇👇👇

          👆👆👆 Advertisement 👆👆👆

– असा आहे कोल्हापूर टस्कर संघ

जुने खेळाडू- राहुल त्रिपाठी (कर्णधार), अंकित बावणे, अथर्व डाकवे, आत्मन पोरे, सिध्दार्थ म्हात्रे, श्रीकांत मुंढे (उपकर्णधार), श्रेयस चव्हाण, सचिन धस, निहाल तुसमाड, सुमित मरकाली

नवीन खेळाडू- रजनीश गुरबानी, अथर्व वनवे, दिग्विजय जाधव, आनंद ठेंगे, दीपक डांगी, भार्गव पाठक, हार्दिक कुरंगळे, वेदांत पाटील, आर्या शहा, विशांत मोरे, सुमित ढेंगरे, आयुष उभे, ऋतुराज विरकर, शुभम माने, निलय नेवास्कर, राजवीर जगताप, धनराज शिंदे, दिलीप मालवियाआणि सुनील यादव.

‘महाराष्ट्र प्रीमियर लीग’च्या (एमपीएल) दोन्ही हंगामात आमच्या ‘कोल्हापूर टस्कर’ संघाने चांगली कामगिरी केली. गतवर्षीच्या स्पर्धेत अंतिम फेरीत मजल मारली, मात्र आम्हाला निसर्गाची साथ लाभली नाही. आता तिसऱ्या हगामांसाठी ‘कोल्हापूर टस्कर’ संघ पुन्हा सज्ज झाला आहे. आमच्या संघात आम्ही नव्याने गुणी आणि होतकरु खेळाडूंना संधी दिली आहे. कोल्हापूर संघाला घवघवीत यश मिळवून देण्याबरोबरच हे खेळाडू पुढे भारतीय संघात जाऊन देशाचंही नाव उज्ज्वल करतील, अशी अपेक्षा आहे.

पुनीत बालन

(मालक, कोल्हापूर टस्कर व अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप)

‘‘महाराष्ट्र प्रीमियर लीग’ (एमपीएल) यावर्षीही अतिशय जोमाने संपन्न होईल. राज्याच्या कानाकोपऱ्यातील होतकरु खेळाडूंना संधी देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शिवाय अधिकाधिक प्रेक्षक या लीगसोबत जोडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. इतर राज्याच्या लीगच्या तुलनेत डिजिटल मीडियावरही ‘महाराष्ट्र प्रीमियर लीग’ला अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि तो यावर्षी आणखी वाढेल याची आम्हाला खात्री आहे.’’

रोहित पवार

(आमदार व अध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन)

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गर्भवती महिलेचा मृत्यू; मृत्यूनंतरही शवविच्छेदनासाठी १४ तास प्रतीक्षा

0
अहेरी(प्रतिनिधी जाबिर खान): भामरागड-अहेरी परिसरातील आरोग्य व्यवस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि रुग्णालयांमधील समन्वयाच्या अभावाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात...

झिंगानूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; जल-जंगल-जमीन आणि संस्कृती जतनाचा संदेश

0
झिंगानूर (प्रतिनिधी जाबिर खान):झिंगानूर येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच...

शासकीय शाळेचा मान उंचावला! शिष्यवृत्ती परीक्षेत दुर्वा गायकवाड चंद्रपूर जिल्ह्यात अव्वल

0
ब्रह्मपुरी(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) हायस्कूलच्या विद्यार्थिनी...

मनसेत शिस्तभंगाची गाज! समीर मोरे यांचे जिल्हाध्यक्षपद स्थगित; राज ठाकरे यांच्या आदेशाने मोठी कारवाई

0
पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार...

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; फरार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

0
पुणे (विशेष प्रतिनिधी): डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी...

error: Content is protected !!