Homeताज्या बातम्याकोश्यारींवर संजय राऊतांचा घणाघात, आधी धोतर नीट नेसा, मग महाराष्ट्राला शिकवा

कोश्यारींवर संजय राऊतांचा घणाघात, आधी धोतर नीट नेसा, मग महाराष्ट्राला शिकवा

 Times Of Maharashtra Desk : भाषिक व राजकीय मुद्द्यांवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संघसरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर केलेल्या टीकेनंतर सुरू झालेल्या वादात आता शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी थेट माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कोश्यारी यांनी राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाबरतात, असा उपरोधिक टोला लगावल्यानंतर संजय राऊत यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत म्हणाले, ज्याला स्वतः धोतर नीट नेसता येत नाही, तो महाराष्ट्राला आणि ठाकरेंना अक्कल शिकवतोय. मोदींना कोण घाबरतंय? सत्तेच्या जोरावर आणि तपास यंत्रणांच्या आधारावर बोलणाऱ्यांनी आधी स्वतःकडे पाहावं, अशी खरमरीत टीका त्यांनी केली.

राऊत पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला पद्मभूषण दिलं जातं, हे दुर्दैव आहे. हा बाळासाहेब ठाकरे यांचा विचार नाही. ज्यांनी असा सन्मान दिला असता, त्यांना बाळासाहेबांनी जोड्याने मारले असते, असेही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी याआधी प्रतिक्रिया देताना राज ठाकरे हे आपल्याला लहान भावासारखे असल्याचे सांगत, संघाच्या कार्यक्रमाला आलेले लोक मोदींना घाबरून आले नव्हते. राज ठाकरे यांनीही मोदींना घाबरू नये, त्यांच्या जवळ जावे. मोदींसाठी सर्व जनता समान आहे, असे विधान केले होते.

या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, कोश्यारींच्या भूमिकेवरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. आगामी काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!