Homeताज्या बातम्याबारा वर्षांपूर्वी हरविलेल्या महिलेचे नातेवाईक शोधण्यात यश; सेलूतील पोलीस हवालदारांची उल्लेखनीय कार्यतत्परता....

बारा वर्षांपूर्वी हरविलेल्या महिलेचे नातेवाईक शोधण्यात यश; सेलूतील पोलीस हवालदारांची उल्लेखनीय कार्यतत्परता….

(प्रवीण चौधरी, परभणी प्रतिनिधी):  मुंबई शहरातील कार्यक्षेत्रात १३ जानेवारी रोजी भिक्षेकरीविरोधी कारवाईदरम्यान एका अनोळखी महिलेचा शोध लागला. संबंधित पोलीस पथकाने तिला जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात आणून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. न्यायालयाच्या आदेशानुसार या महिलेला चेंबूर येथील शेल्टर होममध्ये दाखल करण्यात आले.

‘कोशिश’ची कोशिश सफल 

‘कोशिश’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने महिलेच्या नातेवाईकांचा शोध सुरू करण्यात आला. तपासादरम्यान सदर महिला परभणी जिल्ह्यातील सेलू येथील असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार ‘कोशिश’ संस्थेने सेलू पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.

 अत्यंत तुटपुंज्या माहितीच्या आधारे शोध 

सेलू पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी यांनी अवघ्या १२ तासांत महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात यश मिळविले. गोदावरी राऊत असे या महिलेचे नाव असून, त्या बारा वर्षांपूर्वी सीएसटी, मुंबई येथून बेपत्ता झाल्याची माहिती त्यांचे पुत्र किशोर राऊत यांनी दिली होती.

तपासाअंती शेल्टर होममध्ये असलेली महिला हीच बारा वर्षांपूर्वी हरवलेली गोदावरी राऊत असल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती तत्काळ जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यास कळविण्यात आली.

पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी यांनी दाखविलेल्या समयसूचकता, कार्यतत्परता व जबाबदारीमुळे तब्बल बारा वर्षांनंतर संबंधित महिलेचा तिच्या कुटुंबीयांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पोलीस उपायुक्त परिमंडळ एक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांना पत्राद्वारे माहिती दिली आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह संपूर्ण जिल्हा पोलीस दलाकडून पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!