Homeताज्या बातम्याRupali Thombre Patil Post रुपाली ठोंबरे यांची धमाकेदार पोस्ट; शरद पवार की...

Rupali Thombre Patil Post रुपाली ठोंबरे यांची धमाकेदार पोस्ट; शरद पवार की शिवसेना? नवा राजकीय पेच!

Times of Maharashtra Desk: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट नेत्या रुपाली पाटील ठोंबरे मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. पक्षातील महिला नेत्री रूपाली चाकणकर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर ठोंबरे पक्षातून नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर त्यांनी विविध पदांचा राजीनामा दिल्याच्या बातम्या राजकीय वर्तुळात जोरदार फिरत होत्या. आता त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टनं पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे.
रुपाली ठोंबरे यांनी फेसबुकवर दोन फोटो शेअर केले आहेत. एक फोटो 2005 मधील त्यांचा आहे, तर दुसऱ्या फोटोत शरद पवार आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दिसत आहेत. या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी आपल्या विरोधकांना थेट इशारा दिला आहे. त्या म्हणतात, “पहिला फोटो 2005 मधील आहे बरं का. तेव्हापासून समाजात, राजकारणात स्वतःच्या जीवावर, मनगटाच्या ताकदीवर आणि कामाच्या जोरावर काम करण्यास सुरुवात केली. दुसरा फोटो महाराष्ट्रातील ज्येष्ठ, दिग्गज नेते, जबरदस्त आवडते नेते हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवार साहेब. त्यामुळे आयरे गैरे नथू खैरे, नटरंगी लोकांनी शिकवू नयेच.”

या पोस्टनंतर ठोंबरे कोणत्या पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, याबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही फोटोंमध्ये शरद पवार दिसत असल्याने त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याशिवाय, काही दिवसांपूर्वी रुपाली ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चाही रंगली होती. त्यामुळे त्यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशाचा अंदाज वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे आजच्या पोस्टमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो शेअर केल्याने या चर्चांना आणखी ऊत आला आहे.
रुपाली ठोंबरे पुढचा राजकीय निर्णय काय घेणार, याकडे राज्याचे राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!