Homeताज्या बातम्यादुबार, तीबारवाले दिसले तर त्यांना तिथेच फोडून काढा सत्याच्या मोर्चा मध्ये राज...

दुबार, तीबारवाले दिसले तर त्यांना तिथेच फोडून काढा सत्याच्या मोर्चा मध्ये राज ठाकरे आक्रमक… मोर्चात काय घडलं?

Times of Maharashtra Desk : निवडणूक आयोगाच्या विरोधात विरोधकांचा आज सत्याचा मोर्चा काढण्यात आला होता . या मोर्चासाठी सकाळपासून मुंबईत कार्यकर्ते येत आहेत या मोर्च्यात ऊद्धव ठाकरे , अदित्य ठाकरे , राज ठाकरे, अमित ठाकरे , जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार यांच्यासोबत सर्व विरोधी पक्षाचे नेते ऊपस्थित होते. हा मोर्चा दुपारी 1 वाजता सुरू झाला. फॅशन स्ट्रीट ते महानगरपालिके असा या मोर्चाचा मार्ग होता.यावेळी भाषणामध्ये बोलताना राज ठाकरे यांनी आक्रमक होत दुबार, तीबर मतदानवाले दिसले तर तिथेच फोडून काढा असे वक्तव्य केले आहे.

नक्की मोर्चा कशासाठी? नेमक्या मागण्या काय?
हा मोर्चा मतचोरी व निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात आला होता. या मोरच्यात 4 प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या त्या पुढील प्रमाणे:

  • मतदार यादीतील घोळ संपल्याशिवाय, त्या स्वछ झाल्याशिवाय पुढील 6 महिन्यापर्यन्त कोणतीही निवडणूक घेऊ नये
  • स्थानिक स्वराज्य संस्थानसह महानगरपालिका निवडणुकांच्या अगोदर मतदार याद्या अद्ययावत करून त्या सदोष करा.
  • मतदार याद्यामधील दुबार, तिबार नावे आधी हटवा.
  • 7 नोव्हेंबर पर्यन्त मतदार नोंदणी करा.

मतदार यादीतील दुबार, तिबार नवे म्हणजे सामान्य आणि सच्या मतदार वर्गाचा अपमान आहे, पुन्हा अशी नावे दिसली तर तिथेच फोडून काढू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
मोर्च्या मधील भाषणात राज ठाकरे यांनी आक्रमक होत पुरावा दाखवत उन्हात उभ्या राहणाऱ्या खऱ्या मतदारला किमत आहे की नाही असा सवाल उठवला आहे.

नक्की काय म्हणाले राज ठाकरे?
आजचा मोर्चा हा रंग दाखवण्याचा आणि दिल्लीला आपली ताकद दाखवण्याचा आहे. मतदार यादीत दुबार मतदार आहेत, असे असताना निवडणूक घेण्याची घाई का? मतदार याद्या आधी साफ करा आणि मग मतदान घ्या. कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड, भिवंडीतील साडे चार हजार मतदारांनी मलबार हिल मतदारसंघातही मतदान केले आहे. प्रभाकर तुकाराम पाटील, राम भोईर, पुंडलिक भोईर या लोकांनी त्यांच्या मतदारसंघातही मतदान केले, मलबार हिलमध्येही मतदान केले. अशाप्रकारे लाखो मतदार आहेत असा आरोप करत पुन्हा जर असे मतदार दिसले तर तिथेच फोडून काढू असा इशारा दिल आहे. मतदार घरोघरी जाऊन तपासा, त्या ठिकाणी जर दुबार तिबार मतदार सापडले तर त्यांना तिथेच फोडून काढा. त्यांना बडव बडव बडवायचं आणि पोलिसांच्या ताब्यात द्यायचं, त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत.

नक्की कोणत्या भगत किती दुबार मतदार आहेत राज ठाकरे यांनी वाचली यादी..
भाषणादारम्यान राज ठाकरे यांनी दुबार मतदारांची यादी वाचून दाखवली आहे.उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात १७ लाख २९ हजार मतदारांपैकी ६२३७० मतदार दुबार आहेत. तर दक्षिण मुंबईत १५ लाख १५ हजार ९९३ मतदारांपैकी ५५ हजार मतदार दुबार आहेत. मावळमध्ये १ लाख ४५ हजार ६३६ दुबार मतदार,तर पुणे १ लाख २ हजार दुबार मतदार, ठाणे २ लाख ९ हजार दुबार मतदार आहेत. या सर्वांचे आकडे सांगतानाच संपूर्ण मतदारांचा डेटा माझ्याकडे आहे असे राज ठाकरे म्हणले.एवढे मतदार दुबार असताना जानेवारी महिन्यात निवडणूक कशाला घेता? १ वर्ष निवडणुका लांबल्या तर फरक काम पडतों, मतदार याद्या पारदर्शक करा आणि मग निवडणुका घ्या असे राज ठाकरे आणि निवडणूक आयोगाला बाजावून सांगितले आहेत.

उद्धव ठाकरेंचा विरोधकावर हल्ला , म्हणाले मतदार ही चोरले..
आज एवढे सगळे धडधडीत पुरावे दाखवले, तरीही निवडणूक आयोग त्यावर काहीही कारवाई करत नाही. आपले पक्ष चोरले, नाव चोरले… तेवढंही पुरेसं नाही म्हणून आता मतदारही चीरले जात आहेत. ज्या गोष्टी आता आम्ही विरोधी पक्ष करत आहोत, तसंच सगळ्या मतदारांनीही जागृत व्हावं आणि मतदार याद्या तपासा. आपलं नाव त्यामध्ये आहे की नाही हे तपासा आणि तुमच्या घराच्या पत्त्यावर तुम्हाला माहिती नसलेले किती मलदार आहेत ते तपासा.

उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा नावाने एक ऑनलाईन अर्ज निवडणूक आयोगाकडे करण्यात आला. घरातील मतदार रद्द करण्यासाठी त्याने अर्ज केला होता. तो अर्जही बोगस आणि मोबाईल नंबरही खोटा असल्याचं उघड झालं, त्यावर निवडणूक आयोगाने आमच्याकडे येऊन त्याची खातरजमा केली. माझ्या नावाने खोटवा नंबरने ओटीपी करण्याचा प्रयत्न केला गेला, तो 23 ऑक्टोबर रोजी करण्यात आला. यामागे काही षडयंत्र आहे का हे तपासावं लागेल.असे देखील ते भाषणात म्हणाले.

आम्ही लोकशाही मागनि यांना ठोकण्यासाठी तयार आहोतच, पण आता जनतेनेही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी एकत्र आल पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर लोकशाहीचा खून होत आहे. त्यामुळे हे जे काही चालल आहे थांबवलं पाहिजे.या सगळ्याचे पुरावे घेऊन आम्ही न्यायालयात जाणार आहोत. निवडणूक आयोग तर लाचार झालाच आहे, पण आता न्यायालय काय करतंय ते पाहू. न्यायालय आम्हाला न्याय देईल अशी अपेक्षा आहे. आम्ही पुढे जात असताना तुमची साथ हवी आहे असे ,म्हणत त्यांनी सर्वाना अहवान केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; समता व न्यायाचा संदेश

0
   मारेगाव - यवतमाळ (प्रतिनिधी देवा आत्राम) :  जिल्ह्यातील वाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली....

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा रेड अलर्ट प्रशासन सतर्क, नागरिकांना दक्षतेचे आवाहन

0
 जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) :राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून, जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे....

फळ विक्रेत्याच्या लेकीची गगनभरारी! काशीवाडीच्या आलिया शेखची पोलीस दलात निवड

0
पुणे (प्रतिनिधी): पुण्यातील काशीवाडीसारख्या दाट वस्तीत राहणाऱ्या एका सामान्य फळ विक्रेत्याच्या मुलीने आपल्या जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस दलात भरती होऊन घवघवीत यश संपादन...

चव्हाणवाडीत भीमज्योती जन्मोत्सव प्रेरणादायी; निबंध स्पर्धा, विशेष व्याख्यानातून शिक्षणाची ज्योत प्रज्वलित

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) :  तालुक्यातील चव्हाणवाडी येथे भीमज्योती जन्मोत्सवानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा व विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. गावातील...

दौंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; अन्नदान व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
दौंड (प्रतिनिधी-संघराज गायकवाड) :  गोपाळवाडी रोड, सरपंच वस्ती येथील संविधान तिरंगा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला...

error: Content is protected !!