Homeमहाराष्ट्रगरदरेवाडी (ता. दौंड) येथे अत्याधुनिक STEM लॅबचे लोकार्पण; ‘गुढीपाडवा पट वाढवा’ अभियानाचा...

गरदरेवाडी (ता. दौंड) येथे अत्याधुनिक STEM लॅबचे लोकार्पण; ‘गुढीपाडवा पट वाढवा’ अभियानाचा शुभारंभ

दौंड (प्रतिनिधी, संघराज गायकवाड, मयुर साळवे) : तालुक्यातील गरदरेवाडी (वडगावबांडे) येथील जिल्हा परिषद शाळेत अत्याधुनिक ‘STEM लॅब’ व बहुउद्देशीय सभागृहाचे लोकार्पण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. याच वेळी राज्यस्तरीय “गुढीपाडवा पट वाढवा” या अभियानाचा देखील शुभारंभ करण्यात आला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि त्यांनी जागतिक स्पर्धेत आत्मविश्वासाने उभे राहावे, या उद्देशाने ही अत्याधुनिक STEM लॅब उभारण्यात आली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) विषयांचे प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे शिक्षण मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व नवोपक्रम क्षमतेला चालना मिळणार आहे.

या कार्यक्रमावेळी शिक्षणमंत्री भुसे यांनी शाळेला भेट देऊन विविध शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली. ग्रामीण भागातील शाळा ‘हायटेक’ होत असल्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे सांगत त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उभारण्यात आलेले बहुउद्देशीय सभागृह सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

शाळा ‘स्मार्ट’ व ‘आदर्श’ बनवण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असून, अनेक कंपन्या CSRच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत आहेत, असेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील एकही विद्यार्थी आधुनिक शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, आमदार राहुल फुल, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक परिषदेचे संचालक डॉ. हेमंत वसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील, प्राथमिक शिक्षण संचालक श्री. शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक श्री. महेश पालकर, उपसंचालक श्री. गणपत मोरे तसेच दौंड पंचायत समितीचे सभापती श्री. सुखदेव चोरमले यांच्यासह शिक्षक, पदाधिकारी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गरदरेवाडी येथील शाळेतील आधुनिक सुविधा, शिक्षणासोबत खेळ, ध्यान-धारणा व आहार यावर दिले जाणारे विशेष लक्ष यामुळे ही शाळा ग्रामीण भागातील आदर्श शाळा ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!