Homeताज्या बातम्याJarange Patil : 'CBI चौकशी करा, माझी नार्को टेस्ट करा' जरांगेंच्या आरोपांनंतर...

Jarange Patil : ‘CBI चौकशी करा, माझी नार्को टेस्ट करा’ जरांगेंच्या आरोपांनंतर मुंडेंचे प्रत्युत्तर; ऑडिओ क्लिप ऐकवत जरांगेंनीही आव्हान स्वीकारले

Times of Maharashtra Desk, Pune : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आणि खळबळजनक आरोप केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, त्यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला असून, यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या संपूर्ण कटाचे मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे असल्याचा थेट आरोप जरांगे यांनी केला आहे. जरांगे यांनी असाही दावा केला की, धनंजय मुंडे यांनी आरोपींना बाहेरच्या राज्यातील पासिंगची गाडी आणि विषप्रयोगासाठी गोळ्या पुरवण्याचे आश्वासन दिले होते. मुंडेंच्या पीएने एका आरोपीला परळीला नेले, जिथे मुंडे एका महत्त्वाच्या बैठकीतून बाहेर पडून आरोपीला २० मिनिटे भेटले. तसेच, छत्रपती संभाजीनगरच्या झालटा फाट्यावर मुंडे आरोपींची एक तास वाट पाहत थांबले होते, असे तपशीलही जरांगे यांनी उघड केले. एकतर अपघात घडवणे किंवा औषधातून विषप्रयोग करणे, असा हा प्लॅन होता, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले मुंडे ?

मनोज जरांगे यांच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळून लावले. मुंडे यांनी हे आरोप बिनबुडाचे आणि फालतू असल्याचे म्हणत, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी महाराष्ट्र शासनाने न करता थेट सीबीआय कडून करण्याची मागणी केली. आपल्यावरील आरोपांमुळे संताप व्यक्त करत मुंडे म्हणाले, “जर हे आरोप खरे ठरले, तर माझ्यासहीत अख्ख्या ओबीसी समाजाला गोळ्या घाला आणि संपवून टाका.” इतकेच नाही, तर मुंडे यांनी “माझी, मनोज जरांगेंची आणि ज्या आरोपींना पकडले आहे, त्या तिघांचीही नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग करा,” असे खुले आव्हान दिले. मी ओबीसी आरक्षणाची बाजू लावून धरली, याचाच राग काहींना येत असून, त्यातूनच हे आरोप होत असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटलांनी आव्हान स्वीकारले

धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेनंतर आणि नार्को टेस्टच्या आव्हानानंतर, मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा माध्यमांशी संवाद साधत ते आव्हान तातडीने स्वीकारले. “मी नार्को टेस्टला तयार आहे आणि उद्याच मी गृह मंत्रालय, कोर्ट आणि पोलीस अधीक्षकांकडे जाऊन नार्को टेस्टसाठी पहिला अर्ज करणार,” असे जरांगे यांनी जाहीर केले. यावेळी जरांगे यांनी दोन आरोपींमधील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप पत्रकार परिषदेत ऐकवली आणि धनंजय मुंडेच खरे सूत्रधार असल्याचा पुनरुच्चार केला. “धन्या, मी तुझ्यासारखा नाही, मी जातवाण आहे,” असा थेट टोलाही त्यांनी मुंडेंना लगावला. या आरोप-प्रत्यारोपांमुळे आता या प्रकरणाच्या तपासाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांना दुर्गेसारखे रथ चालविण्याचे दिवस आले आहेत : ज्येष्ठ विधीतज्ञ विलास...

0
दौंड :(प्रतिनिधी संघराज गायकवाड मयुर साळवे) महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस व वीरधवल...

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत वाजे विद्यालयाची घवघवीत कामगिरी; २५ विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संचलित लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालय, सिन्नर येथील विद्यार्थ्यांनी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन...

शिवाजी खंडू कांडेकर यांचे अल्पशा आजाराने निधन

0
गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड)  गेवराई तालुक्यातील गेवराई येथील भूमिपुत्र तथा संभाजीनगर येथे वास्तव्यास असणारे शिवाजी कांडेकर वय वर्ष 58 यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन...

कंत्राटदाराला नोटीस बजावा, टोल बंद करा!’; उड्डाणपुलाच्या दुरवस्थेवर अविनाश राऊतांचा प्रशासनाला इशारा.

0
ब्रह्मपुरी:(प्रतिनिधी रुपेश देशमुख)  ब्रम्हपुरी ते नागभीड या राज्य मार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या संथ कारभारामुळे आणि संबंधित कंत्राटदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे सर्वसामान्य वाहनधारकांना व नागरिकांना नाहक...

मतदार जागा झाला तरच देश बदलेल! — भेसळयुक्त राजकारणाला जनतेनेच थांबवण्याची वेळ आली आहे.

0
nilesh thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद कोणाची असेल, तर ती कोणत्याही नेत्याची, पक्षाची किंवा सत्तेची नसते; ती असते मतदाराची....

error: Content is protected !!