Homeताज्या बातम्याGovernment Water Scheme:"हर घर जल" हा शासनाचा उपक्रम फक्त कागदावरच पूर्णा तालुक्यातील...

Government Water Scheme:”हर घर जल” हा शासनाचा उपक्रम फक्त कागदावरच पूर्णा तालुक्यातील अनेक गावातील नळ कोरडे

Times of Maharashtra Desk Government Water Scheme: परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात “हर घर जल” हा शासनाचा उपक्रम फक्त कागदावरच आहे की काय? असा प्रश्न पडला आहे. तालुक्यातील गावांमध्ये शासनाकडून जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे परंतु योजना चालू झाली तरी येथील बऱ्याच गावातील नळ अद्यापही कोरडेच आहेत. या योजनेसाठी शासना कडून कोट्यावधीची निधी मंजूर होऊन देखील अजूनही इथल्या अनेक गावात पाणी पुरवठा सुरू झाला नाही. ज्या अभियंताना या योजनेचे काम दिले होते त्याच्या हलगर्जीपणामुळे या योजनेची दुर्दशा झाली आहे. असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

नेमकी योजना काय?
जलजीवन योजने अंतर्गत गावात पाण्याच्या टाक्या बसवणे, पाइपलाइन टाकणे , नळ जोडणे व संपूर्ण गावाला पाणी पुरवणे ही कामे करण्यात येणार होती. या कामांची जबाबदारी ठेकेदारांना देण्यात आली होती. ही कामे काही भागात पूर्ण झाली आहेत, तर काही भागात अद्यापही कामे कासवाच्या गतीने चालू आहेत. काम पूर्ण झालेल्या भागात देखील अद्याप पाणी सुरू झाले नाही. यावरून शासनाने दिलेला निधी वाया गेला असेच चित्र दिसत आहेत.
ही योजना ग्रामपंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाच्या नियंत्रणाखाली राबवण्यात येत असून त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही योजना नुसती कागदापुरती मर्यादित राहिली आहे असे ग्रामस्थानेचे म्हणणे आहे. ठेकेदाराकडून बऱ्याच ठिकाणी कामे अर्धवट ठेवण्यात आली आहेत, तर जिथे कामे पूर्ण झाली आहेत तिथे अद्यापही पाणीपुरवठा झालेला नाही. येथील नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी गेल्यावर उपविभागाव व कनिष्ठ अभियंते कार्यालयात हजर नसल्याचे वारंवार दिसते. अनेकदा त्यांच्या कक्षांना कुलूप असते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सरकारने खबरदारी घ्यावी व लवकरात लवकर कारवाई करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

धुळे व नंदुरबार मंडलातील जनमित्रांना सुरक्षा साहित्याचे वाटप

0
दैनंदिन कामकाज करताना विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांचे आवाहन जळगाव : दैनंदिन कामकाज करताना सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या आणि...

कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते विनोद नरसाळे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव

0
गेवराई : प्रतिनिधी विष्णु गायकवाड  गेवराई तालुक्यातील कोळगावचे भूमिपुत्र तथा गेवराई तालुका दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद नरसाळे यांचा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री...

बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणात भाजप नेते संजय गरुड अटकेत; तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता

0
प्रतिनिधी : विनोद पवार | जळगाव  राज्यभर चर्चेत असलेल्या कथित बनावट 'शालार्थ आयडी' प्रकरणात नाशिक एसआयटीच्या विशेष तपास पथकाने शेदूर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व...

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा* – *श्री.विवेक पाटील

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) किसान विद्या प्रसारक संस्था संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सी.बी.एस.ई स्कूल, शिरपूर येथे भारतरत्न, माजी राष्ट्रपती तथा 'मिसाईल मॅन' म्हणून...

सांगली पोलिसांचा विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा व अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम

0
सांगलीछ(प्रतिनिधि वाहिद मुल्ला) सोमवार दि. 27.07.2026 रोजी सांगली पोलीस दलातर्फे बिरनाळे पब्लिक स्कूल, संजयनगर येथे "सायबर गुन्हे, अंमली पदार्थाचे होणारे दुष्परीणाम, महिला सुरक्षा व...

error: Content is protected !!